इंदिरानगर पोस्टे. हद्दीतील पाथर्डी शिवारातील तीन पत्ती जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त यांचे पथकाचा छापा…!
लाल दिवा -नाशिक,दि.१९ : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी कार्यभार स्विकारल्या पासून सर्वच प्रकारच्या अवैध धंदया विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित करून स्वतंत्रपणे विशेष | पथकांची स्थापना देखील केलेली आहे. त्याच प्रमाणे अवैध धंदयाची माहिती देणेसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी मोबाईल नंबर देखील जारी केला आहे.
- श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी देखील परिमंडळ – २ यांचा कार्यभार स्विकारल्या पासून अधिनस्त विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदया विरुद्ध सक्त कारवाई करणे संदर्भात आदेशित केले आहे.
- श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२, यांना दि. १८/१०/२०२३ रोजी, गुप्त | बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इंदिरानगर पोस्टे. हद्दीत पेरुचा मळा परिसरात पाथर्डी शिवार येथे प्रकाश | बांदेकर यांचे जागेत पत्र्याचे शेड मध्ये समीर पठाण हा इसम पैश्यांवर तीन पत्ती जुगार मोठया प्रमाणात खेळवत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त यांनी त्वरीत प्रभावाने | टिम तयार करून, सदर टिमला योग्य ती गोपनियता ठेवून छाप्याचे नियोजन व प्रत्यक्ष खातरजमा करून छापा | यशस्वी करणे बाबत आदेशित केले. त्याप्रमाणे सदर टिमने खालील प्रमाणे १४ आरोपी, रोख रुपये ८५,२८५/-, जुगाराचे साहित्य साधने, ११ मोटार सायकली, ०६ चारचाकी वाहने, ०१ रिक्षा २१ मोबाईल, असा , १२,४७,००० /- रुपयाचा माल, असा एकुण १३,३२,२८५ /- (अक्षरी रुपये तेरा लाख, बत्तीस हजार, दोनशे पंच्यांशी) माल जप्त करुन सदरचा तीन पत्ती जुगार अड्डयावर श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२, यांचे मार्गदर्शनाखाली छापेमारी करुन उत्कृष्ठ अशी कामगिरी केली आहे. आर्थिक फायदयासाठी | सदर जुगार अड्डा चालविणारा व जुगार अड्डयासाठी जागा उपलब्ध करुन देणारा तसेच सदर अवैध धंदयांतील अन्य आरोपी निष्पन्न करून कडक अशी कारवाई करण्यांत येणार आहे. त्याच प्रमाणे नाशिक महानगर पालिकेस | पत्रव्यवहार करून सदर जागेची खातरजमा करून रितसर कारवाई करुन उभारण्यांत आलेले पत्र्याचे शेड, सिमेंट | विटा मध्ये बांधलेले बांधकाम हे अतिक्रमित असल्यास काढून टाकण्यात येणार आहे.
सदर कारवाई बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनला गुरनं २९१ / २०२३, महाराष्ट्र जुगार कायदा कलम | ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील तपास चालू आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1