शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून….होऊ द्या चर्चा…….आगामी निवडणुकीत भाजपाला शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील …..शिवसेना उपनेते रविन्द्र मिर्लेकर……होऊ द्या चर्चा उपक्रमात प्रभाग क्रमांक १७ मध्ये जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..!
लाल दिवा-नाशिक,दि.९ : शिवसेनाप्रमुख यांच्या मदतीने भारतीय जनता पक्ष हा विस्तरला गेला, मात्र वेळेवर या भाजपाने आपले खरे रुप दाखवुन शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र आगामी निवडणुकीत शिवसैनिक भाजपाला त्यांची जागा दाखवतील असे प्रतिपादन शिवसेना नेते रविंद्र मिर्लेकर यांनी केले आहे.
शिवसेनेच्या वतीने (उध्दव ठाकरे गट) होऊ दे चर्चा हा उपक्रम हाती घेवुन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. रविवारी या उपक्रमाचा रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील प्रभाग १७ मध्ये जेष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मिर्लेकर यांनी सांगितले की, भाजपाचे विखारी धोरण, समाजाच फुट पाडण्याचा अजेंडा आणि सहकारी पक्षांना संपविण्याचे धोरण यावर प्रखर टिका केली. मोदी हे देशात सत्तेवर आले तेव्हा देशावर ५२ हजार कोटी रुपयाचे कर्ज होते, मात्र आता देशावर १ लाख ३६ हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.तरुण हे बेरोजगार झाले आहे.गरिब मुलं ही शिक्षणापासुन वंचित रहात असल्याचे यावेळी मिर्लेकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते दत्ताजीनाना गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, शिवसेना नेते वसंतभाऊ गिते, शिवसेना नेत्या संगीताताई खोदाणा, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, मा.नगरसेवक सुनिल बोराडे, मा.नगरसेवक भैय्या मनियार, मा. नगरसेवक रतन बोराडे, मा.नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, मा.नगरसेविका डॉ सीमा ताजणे, शिवसेना नेते दिनकर आप्पा आढाव, काका पवार, योगेश नागरे, नितिन चिडे, मसूद जिलानी, अरुण माळोदे, शैलेश सूर्यवंशी, सुनिल निरगुडे, हर्षद पटेल, संजय थोरवे, योगेश गाडेकर, सागर भोजने, विजय भागवत, स्वप्निल औटे, सागर निकाळे, विजय भालेराव, किरण डहाळे, चंदू महानुभाव,दिपक काळे, अमित भगत, अनिल गायखे, प्रकाश सोमवंशी, शिवा गाढे, पंकज गाडगीळ, विकास ढकोलीया, कैलास बारवकर, सागर भोर, समर्थ मुठाळ,आकाश उगले, मंदा गवळी, स्वाती पाटिल, योगिता गायकवाड, माधुरी पाटील, कीर्ती निरगुडे, सीमा डावखर, सुवर्णा काळुंगे, ज्योती गोडसे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक प्रशांतभाऊ दिवे , नगरसेविका मंगलाताई आढाव, विभाग प्रमुख गणेश गडाख, रोशन आढाव यांनी केले..
सूत्रसंचालन विभाग संघटक कुलदीप आढाव यांनी केले..
सदर कार्यक्रमासाठी विनायक आढाव, प्रकाश जगताप, प्रशांत पाटील, मयूर आढाव, अमोल धावणे, नागेश इंगोले, सुमित उगले, वैभव देशमाने, राकेश घोलप यांनी परिश्रम घेतले..