एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेल्या फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने हैद्राबाद, तेलंगणा येथून केले जेरबंद
लाल दिवा : सिडको, प्रतिनिधी विक्रांत डहाळे: सातपुर पोलीस ठाणे हद्दीत श्रमीक नगर, कार्बन नाका, शिवाजी नगर, सातपुर गाव, अशोक नगर व नजीकच्या लगतच्या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर दहशत कायम रहावी यासाठी अक्षय युवराज पाटील वय २८ वर्ष, रा. आनंद सागर अपार्टमेंट, रुम नं.-५, श्रमीक नगर, सातपुर, नाशिक याने सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार व मारहाणकरुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यास दिनांक ११/०३/२०२१ रोजी ०१ वर्षा करिता हद्दपार करण्यत आले होते.
अक्षय युवराज पाटील याने हद्दपार कालावधी मध्ये पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालु ठेवुन जनजिवन विस्कळीत केल्याने मा. पोलीस आयुक्त यांनी एम. पी.डी.ए कायदा सन १९८१ चे कलम ३ (२) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक ०८/०२/२०२३ रोजी जारी केले होते. स्थानबध्दतेची कारवाई चुकविण्यासाठी आरोपी अक्षय युवराज पाटील हा अल्पवयीन मुलीला अपहृत करून फरार झालेला होता. त्याचे वास्तव्याबाबत मागील आठ महिन्यांपासुन काही एक माहिती मिळुन येत नव्हती. अशातच गुंडा विरोधी पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी अक्षय युवराज पाटील हा अल्पवयीन मुलीस घेवुन हैद्राबाद, राज्य तेलांगणा या ठिकाणी वास्तव्यास आहे. गोपनीय माहितीच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी अक्षय युवराज पाटील याचा हैद्राबाद, राज्य तेलांगणा या ठिकाणी जावुन शोध घेवुन अथक परिश्रमांती स्थानबध्द इसम अक्षय युवराज पाटील यास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.
स्थानबध्द कारवाई चुकविण्याकरीता फरार झालेल्या आरोपीस जेरबंद करण्याची उल्लेखणीय कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे, मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर, श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप, मपो अं मनिषा सौरभ कांबळे, यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.