नरेंद्र मोदींचे स्वप्नं साकारणार….! ग्रामीण भागातील खेळाडूंचे नाव देशात झळकणार-केंद्रीय मंत्री भारतीताई पवार जीवनात खेळ महत्वाचा,पण यासोबत पर्यावरण देखील जोपासा – मकरंद अनासपुरे….!

उदय वायकोळे चांदवड

, लाल दिवा-नाशिक,ता.२: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार चषक 2023 या खेळ मोहत्सवाचे खासदार डॉ.भारतीताई प्रविण पवार यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला दि. 27 मे पासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमाचा समारोप दि.31 मे रोजी चांदवड येथे श्री. नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेत मराठी चित्रपट सृष्टीतील हास्यसम्राट व सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपूरे व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाणी चांदवड देवळा विधानसभा सदस्य डॉ राहुल दादा आहेर हे उपस्थित होते तसेच भारतीय जिल्हा सरचिटणीस तथा चांदवड प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी कार्यक्रमाची रूपरेषा नियोजन करून सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने चषकाचा फिवर शिगेला पोहचला होता. उन्हाळी सुट्टीत युवक युवतींसाठी करमणुकीतून खेळ महोत्सवाची पर्वणीच असून सोबत संघ व वैयक्तिकी रोख बक्षिसांची लयलूट होताना दिसून आली. खासदार चषक 2023 या खेळ मोहत्सवात दिंडोरी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला,मनमाड या मंडलात तालुकास्तरीय स्पर्धा दि.27 मे ते 29 मे दरम्यान घेण्यात आल्या. यात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कबड्डी या चार खेळांचा समावेश होता. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघाना 15 हजार तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाला 11 हजार रुपये बक्षिस देण्यात आले. तसेच वैयक्तिक बक्षिसे व सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले. या स्पर्धा सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आल्या असून तालुकास्तरीय स्पर्धा संपल्यानंतर दि. 31 मे रोजी श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचार्याश्रम संस्था चांदवड, ता. चांदवड, जि. नाशिक येथे तालुक्यातील विजयी संघांचे जिल्हास्तरीय सामने सकाळी 7 वाजेपासून घेण्यात आले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांदवड येथील भारतीय जनता पार्टी व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर यांनी पर्यंत केला. या ठिकाणी होणाऱ्या सामन्यात विजयी संघाना 51 हजार तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाना 21 हजार रुपये बक्षीस असे जिल्हा परितोषिक देण्यात आले. तसेच तालुक्याला प्रथम 15 हजार तर द्वितीय 11 हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले.

        यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भातून अनेक खेळाडूंनी आपली महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. यात उल्लेखनीय कामगिरी करा आम्ही नेहमी आपल्या सोबत आहे कोणतीही अडचण भासल्यास नाम फाउंडेशन देखील मदत करेल असे सांगितले. आपल्या गावाचे नाव देशात झळकावण्याचा मान अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंनी घेतला आहे असेच देशात मान सन्मान प्राप्त करावा असे मत यावेळी मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. खेळ कोणताही असो आपले नाव असेच डॉ. भारतीताई पवार यांनी देखील कमावले आहे.काही वर्षा पासून या नाशिक जिल्ह्यातील पहिल्या मंत्री झाल्या तर या देखील राजकारणाचा खेळ खेळूनच मंत्री झाल्या यासाठी यांनी खूपच मेहनत घेतली आहे.सर्व सामन्याची कामे करत जनसामान्यांना न्याय दिला आहे. हे सर्व करत असताना प्रत्येकानी एक झाड लावा त्याचे संगोपन करा पर्यावरण जपणे ही पण आली नैतिक जबाबदारी आहे असे यावेळी यांनी आपल्या संदेशात सांगितले.

       भारतीताई पवार यांनी सांगितले की, हा कार्यक्रम मि आपल्या लोकसभा मतदार संघात घेतला यापुढे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात कसा होईल आणि यात राज्यात आणि केंद्रात कसे खेळ खेळून खेळाडू आपले नाव तळागळातून ग्रामीण भागातून कसे रोशन करतील याकडेच भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी यांच्या संकलपणेतून खेळाडूंना नवी दिशा देण्याचे काम आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करत आहोत अशी माहिती भारतीताई पवार यांनी सांगितली. या कार्यक्रमासाठी आज पारितोषिक दिलेल्या सर्व संस्थांचे तसेच व्यक्तिगत बक्षीस दिलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते असे भारतीताई पवार यांनी आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर, बेबीलाल संचेती, अजितकुमार सुराणा, भूषण कासलीवाल, जवाहर अबड,अशोक काका व्यवहारे, वाल्मीक वानखेडे,बाजीराव वानखेडे,विशाल ललवाणी, प्रशांत वैद्य, मनोज बांगरे,क्रीडा अधिकारी अविनाश टिळे मनोज शिंदे, दीपक खैरनार, जयकुमार फुलवाणी, शांताराम ठाकरे, गणपत ठाकरे ,योगेश धोमसे,विजय धाकराव,नितीन गांगुर्डे,बाळासाहेब माळी,किशोर चव्हाण,मोहन शर्मा,प्रशांत ठाकरे, संजय पाडवी, मच्छिंद्र गांगुर्डे, मनोहर मोरे यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती शिरवाडकर यांनी केले तसेच प्रास्तविक प्रशांत ठाकरे यांनी केले तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता केली. नेमिनाथ येथील संचालक व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणत सहकार्य करत मेहनत घेतली. प्रशांत ठाकरे,रुपेश शिरोडे, शिपी सर,नायर सर,नितीन फंगाळ,प्राची कोटेचा,सेजल गांधी,सुरेंद्र बडोदे, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

 

जिल्हा चार खेळ प्रथम पारितोषक खालील प्रमाणे.

 

हॉलिबॉल – महिला गट – सुरगाणा तालुका

हॉलिबॉल – पुरुष गट – येवला तालुका

 

कबड्डी – महिला गट – कळवण तालुका

कबड्डी – पुरुष गट – निफाड तालुका

 

रस्सीखेच – महिला गट – येवला तालुका

रस्सीखेच – पुरुष गट – येवला तालुका

 

क्रिकेट – फक्त पुरुष गट – निफाड तालुका

 

याप्रमाणे जिल्ह्यातील पारितोषक पटकविण्याचा मान या खासदार चषक स्पर्धेत या संघांनी घेतला यासर्वांचे आभार मानण्यात आले व यांना ट्रॉफी रोख रक्कम 51000 रुपये व मेडल देऊन यांचा सन्मान करण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!