जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलीसांचे पुन्हा धाडसत्र……. ६६ हातभट्टी अड्ड्यांवर एकाचवेळी छापे – ३१ गुन्हे दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

लाल दिवा-नाशिक,ता.१ : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक २५ मे रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील ४६ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सुमारे १० लाख रुपयांची गावठी दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल केले होते.

 

आठवडाभरातच आज दिनांक ०१ जून रोजी पहाटे ५:०० वाजता ग्रामीण पोलीसांच्या सुमारे ५५० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ६६ ठिकाणी एकाच वेळी पुन्हा छापे टाकून सुमारे ११ लाख रुपयांची तयार गावठी दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून संबंधीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३१ गुन्हे दाखल केले आहेत.

या धाडसत्रात जिल्ह्यातील सटाणा मधील ७, कळवण मधील ५, वाडीव-हे, घोटी, जायखेडा मधील प्रत्येकी ४, देवळा, इगतपुरी, एम.आय.डी.सी. सिन्नर मधील प्रत्येकी २ व पेठमधील १ ठिकाणांचा समावेश आहे..

 

सदर मोहीमेदरम्यान पोलीसांनी अवैध दारु गाळप करणा-या ठिकाणांसोबतच, रसायन बनवण्यासाठी लागणा-या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे. जिल्हयातील डोंगर-द-या, नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे.

 

आज रोजीचे छापा कारवाईत देवळा तालुक्यातील चिंचवे गावातील पाझर तलावाचे काठावर लोखंडी

 

पाईप / फॅन व बॅटरीचे सहाय्याने भट्टीला अतिरिक्त हवा देण्याचे हॅण्डमेड ब्लोअर सुध्दा हस्तगत करण्यात आले

 

आहे.

 

सदर कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे व देवळा तालुक्यातील चिंचवे गावचे शिवारात धाडसत्रामध्ये स्वतः सहभाग घेवून पोलीस पथकांतील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. तसेच नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांचेसह सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप जाधव, श्री. पुष्कराज सूर्यवंशी, श्रीमती कविता फडतरे, ३८ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह १२ विशेष पथके अश एकूण ५५० पोलीसांनी सदर छापा कारवाईत सहभाग घेतला.

 

अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी नुकतीच १२ विशेष पथके गठीत केली असून त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणी चालणा-या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात येत आहेत.

 

अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर माहीती द्यावी, माहीती देणा-या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दुषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणा-या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले असून अशा प्रकारचे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलीसांना तात्काळ संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!