फायरिंगच्या गुन्हयातील आरोपी गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई..!
लाल दिवा : विशाल चंद्रकांत भालेराव व त्याचे गुन्हेगारी संघटनेचे सदस्य १) विकास उर्फ विक्की विनोद वाघ, २) जय संतोष खरात, ३) संदिप रघुनाथ आहीरे, अशांनी विशाल भालेराव हा | हददपार असतांना देखील दिनांक ११ / ३ / २०२३ रोजी रात्री २०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी श्री. प्रेम दयानंद महाले व त्याचा मित्र युवरान शेळके असे फुलेनगर, पेठरोड तीन पुतळयाजवळ, पंचवटी नाशिक येथे उभे असतांना विशाल भालेराव व त्याचे साथीदार यांनी हातात लोखंडे कोयते घेवुन विकास उर्फ विक्की वाघ याने त्याचे हातात गावठी बनावटीचा कटटा (पिस्तोल) हे प्राणघातक हत्यार घेवुन काहीएक कारण नसतांना फिर्यादी प्रेम महाले यांना जिवेठार मारण्याच्या उददेश्याले त्यांच्याकडील प्राणघातक हत्यारानिशी हल्ला केला.
<span;>सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार विशार चंद्रकांत भालेराव, वय ३२, रा. मुंजाबाबा गल्ली, तीन पुतळयाचे मागे, शेषराव महाराज चौक, फुलेनगर पंचवटी नाशिक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार १) विकास उर्फ विक्की विनोद वाघ, वय २५ वर्षे, रा. मरिमाता मंदिराचे मागे, पाठकिनारी फुलेनगर, पंचवटी नाशिक २) जय संतोष खरात, वय १९ वर्षे, रा. संदिप लॉन्ड्री जवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी नाशिक ३) संदीप रघुनाथ आहीरे, वय- २० वर्षे, रा. संदिप लॉन्ड्री जवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी नाशिक यांचे सोबत मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली असुन एकटयाने किंवा संघटीत रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील पंचवटी, उपनगर परिसरात लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगुन धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडयाचा प्रयत्न करणे, लोकांची लुटमार मारणे, अनाधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणीचे प्रकार करणे, हप्ते गोळा करुन परिसरात दहशत निर्माण केली आहे. मुख्य आरोपी विशाल चंद्रकात भालेराव या टोळी प्रमुखाने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने एकटयाने व संयुक्तपणे हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन आर्थीक फायदयासाठी हप्ते गोळा करणे तसेच परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसुल करणे याप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवलेले आहे. सदर टोळीतील सदस्यांविरुध्द एकुण ११ गुन्हे पंचवटी, व उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले
<span;>आहेत.
<span;>वरील गुन्हयातील टोळी प्रमुख व सदस्य क्र. १ ते ३ यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्यांचेविरुध्द संघटीत रित्या गुन्हा केला असल्याने मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई होणेकरीता ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३ (१) (1), ३(२), ३(४), ३(५) ही वाढीव कलमे लावुन मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आलेली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग नाशिक शहर यांचेकडे सोपविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नमुद इसमांनी नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेचे जनजिवन विस्कळीत केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी मोक्का कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाह केल्यामुळे नाशिक शहरातील नागरीकांनी सदर कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे. यापुढे देखील नाशिक शहरातील जनजिवन विस्कळीत करणा-या व समाजस्वास्थ बिघडविणा-या इसमांवर मोक्का / एमपीडीए. कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याचे प्रक्रिया सुरुच राहणार आहे.