अपंगांच्या सोयीच्या बदलीसाठी उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन…!
लाल दिवा : दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या बदल्या होत नसल्याच्या निषेधार्थ ३० मे रोजी उपोषण व दिनांक १३ जून रोजी उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करणार आहे. ऑल इंडिया संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे.
उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक हे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णयानुसार त्यांच्या घराजवळ सोयीच्या ठिकाणी करत नाही. दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार करीत नाही. त्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने ३० मे रोजी त्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही मागण्या मान्य न केल्यास १३ जून रोजी कार्यालयाला टाळे ठोको पंचनामा न्याय मागणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ऑल इंडिया संविधान आर्मीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दिलावर मनियार यांनी दिलेले आहे.
सदरचे आंदोलन हे जगन सोनवणे, राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मी संविधान रक्षक सैनिक बी ए एल एल बी यांचे आदेशान्वये करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
राकेश बगगण प्रदेश प्रमुख संविधान आर्मी व संगपाल क्रितिकल प्रदेश मीडिया प्रमुख ऑल इंडिया संविधान आर्मी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जन आंदोलनात नाशिककर जनतेने आणि दिव्यांग बंधू आणि भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.