खुनातील आरोपीस नाशिक कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा !
लाल दिवा, ता. ९ : पंचवटी पो. ठाणेकडील भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८ lगुन्हयातील आरोपीस जन्मठेप व प्रत्येकी १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील पंचवटी पोलीस ठाणेच्या हददीत दि. १८/०५/२०१७ रोजी २२.०५ वा.चे. सुमारास साळवे यांचे घरासमोर नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी नाशिक येथे घडलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १) गणेश अशोक उघडे, वय ३० वर्षे, २) जितेश उर्फ बंडू संतोष मुर्तडक, वय ३७ वर्षे, ३) संतोष विजय पगारे, वय ३६ वर्षे, ४) सागर विठठल जाधव, वय ३२ वर्षे, ५) संतोष अशोक उघडे वय ३२ वर्षे, ६) जयेश उर्फ जया हिरामण दिवे वय ३५ वर्षे, सर्व रा. फुलेनगर, दिंडोरी रोड पंचवटी, नाशिक यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून फिर्यादी नितिन दिनकर पगारे, वय ३५ वर्षे, रा. म्हसरुळ, राजवाडा, नाशिक यांचा मावस भाऊ ( गुन्हयातील मयत ) किरण राहूल निकम याचेसोबत सुमारे चार-पाच महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील धारदार शस्त्राने (मयत ) किरण निकम याचे शरिरावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले म्हणुन आरोपीतांविरूध्द पंचवटी पोलीस ठाणेत भादंवि
कलम ३०२, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस नरीक्षक, के. डी. वाघ, तत्कालीन नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर, यांनी केलेला असून त्यांनी आरोपीतांविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन अतिशय चिकाटीने तपास केला व आरोपींविरुध्द मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०५, नाशिक येथे सुरू होती.
आज दिनांक ०९/०५/२०२३ रोजी मा.व्ही. पी. देसाई, जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०५, नाशिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी क्रमांक १, २, ३ व ५ यांना सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये खालील प्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे.
१. आरोपी क्रमांक १,२,३ व ५ यांना भादंवि कलम ३०२, १२० (ब), १४९ मध्ये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी १०,०००/-रुपये दंड, दंड न भरल्यास ०६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून डॉ. सुधिर कोतवाल यांनी कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा. ४१५ / एम. एम. पिंगळे, नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर व कोर्ट डयुटी पोअं. मपोकॉ. १३४ / एस. टी. बहिरम, नेमणूक अभियोग कक्ष, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
वरील गुन्हयातील तपासी अंमलदार, पैरवी अधिकारी व कोर्ट अंमलदार यांनी गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. पोलीस आयुक्त व मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ – १, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा व प्रभारी अधिकारी, अभियोग कक्ष, नाशिक शहर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.