अंबड एमआयडीसी (चुंचाळे) पोलीस चौकी अंतर्गत एमआयडीसी कंपनीत चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराना मुद्देमालासह केले जेरबंद !

सिडको, ता. २ : पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे याचे संकल्पनेतून अंबड एमआयडीसी (चुंचाळे) पोलीस चौकी करीता स्वतंत्र पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून दिनांक १०/०४/०२३ रोजी पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. मा. पोलीस आयुक्त सागो, यांचे आदेशाप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ – २, तसेच मा. सपोआ, अंबड विभाग

 

यांचे सुचना व मार्गदशनाखाली कामकाज सुरू झाले. अंबड पोलीस स्टेशन गु.र.नं. १७० / २०२३ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हयात मे. मल्टीटेक कॉर्पोरेशन कंपनी, अंबड एमआयडीसी नाशिक येथे दिनांक १६/०३/२०२३ रोजी अज्ञात इसमानी १,८७,०४८/- रू. किं.चे शॉकअप ट्यूब बॉक्स चोरीस गेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

 

मा.पोलीस आयुक्त सो व मा. पोलीस उप आयुक्त श्री. चंदकांत खांडवी सो, परि-२, नाशिक शहर यांनी दिनांक २९/०४/२०२३ रोजी पोलीस स्टेशन हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविणेबाबत आदेश दिले होते. मा. महोदयाचे आदेशाने प्रमाणे अंबड एमआयडीसी (चुंचाळे) पोलीस चौकी अंतर्गत प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. राजु पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली घरकुल योजना चुंचाळे परीसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

 

कोंबिंग ऑपरेशन राबविताना पोनि पाचोरकर याना गोपनिय माहिती मिळाली की, एमआयडीसी कंपनी मध्ये चोरी करणारे चोर / इसम हे घरकुल येथे असल्याची माहिती मिळाली. पोनि पाचोरकर यांनी पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून लागलीच गोपनिय माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा लावून दोन संशयीत इसमाना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नाव गाव विचारता त्यानी आपली नावे अनुक्रमे १) आदित्य देवानंद पांडे वय २२ वर्षे २) विशाल संतोष कु-हाडे, वय २५ वर्षे ३) गुरूप्रित बलदेवसिंग देओल वय २३ वर्षे ४) प्रकाश बाबुराव शिंदे वय ३२ वर्षे ५) प्रकाश भगवान वातुळे वय ३५ वर्षे सर्व राहणार घरकुल योजना, चुंचाळे परीसर अंबड, नाशिक असले असल्याचे सांगुन त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यानी अंबड पोलीस स्टेशन कडील खालील नमूद गुन्हेत चोरी केलेबाबत सांगितले-

 

गु. रं. नंबर

 

१) गु.र.नं. १७० / २०२३ भादवि कलम ३७९,

 

२) गु. रं. नं. २६६ / २०२३ भादवि कलम ३८०

 

३) गु.र.नं. २६७ / २०२३ भादवि कलम ३८०

 

४) गु.र.नं. २७२ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८०

 

५) गुन्हयात वापरेलेली वाहने

 

मुद्देमाल व रक्कम

 

३०० कि.ग्रॅ. लोखंडी प्रेस केलेला वस्तू – १,५०,०००/-

 

स्टीलचे ४ प्लेट मुद्देमाल ६५,०००/- –

 

लोखंडी चॅनल, ४शटर व इतर ५६०५०/- –

 

७६ कि.गै. चे स्टील व लोखंडी प्लॅच डायप्लेट व चॅनेल – ३५९००/-

 

०२ मोटार सायकल ४०,०००/-

 

नमूद गुन्हयातील मुदुमाल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयात चोरीस गेलेला गुद्देमाल लोखंडी, स्टील, मुद्देमाल असे तसेच गुन्हयात वापरलेली ०२ मोटार सायकल एमएच १५ डीक्यू ६४१९, एमएच ०५ एसी ३२५७ असे एकण ३,४६,९५० रू. किं.चा गुन्हयात चोरलेला मुददेमाल व गुन्हयात वापरलेले मोटारसायकल आरोपीताकडून तपास कामी जप्त केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!