महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत !

लाल दिवा, नाशिक: दि.३० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.

 

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.

 

            महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

 

                        प्रतिक्रिया

     अस्तित्व अकॅडमी संचालक लखन अग्रवाल 

 

परीक्षा उपकेंद्रांवर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यात अडचणी आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, अशा अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 विषयानुरूप प्रश्न :- 

▪️इतिहास- 10

▪️भूगोल- 10

▪️अर्थव्यवस्था -15

▪️चालू घडामोडी -15

▪️राज्यव्यवस्था- 15

▪️विज्ञान – 15

▪️गणित आणि बुद्धिमत्ता- 20

7 विषय असता..100 मार्क्स चा पेपर असतो

अशी माहिती अस्तित्व अकॅडमी चे संचालक लखन अग्रवाल यांनी आपल्या अधिकृत चॅनेल लाल दिवा न्युज ला दिली… आहे.,…!

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!