चांदवडच्या “गोळेचा” प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल !

लाल दिवा, ता. ३० : चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा हे प्रकरण गेल्या २ वर्षांपासून चर्चेत असून विविध शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा योग्य तो न्याय न मिळाल्याने शेवटी श्रीमती गोळेचा यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई कार्यालयात स्वतः जाऊन दि 12/04/2023 रोजी तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यलयातील समुपदेशक व सदस्य यांनी गोळेचा यांची पूर्ण बाजू ऐकून घेतली व आयोगाने त्याची दखल घेऊन दि 26/04/2023 रोजी मा पोलीस अधीक्षक नाशिक व शिक्षण उपसंचालक नाशिक यांना पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करून अर्जदारास कळवून तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12(2) व 12(3) नुसार केलेल्या कार्यवाहीचा तपशील तात्काळ राज्य महिला आयोगास पाठविण्यास सांगितला आहे.

 श्रीमती गोळेचा यांनी राज्य महिला आयोगात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की 20/10/2020 संस्थेचे पदाधिकारी बेबीलाल संचेती,जवाहरलाल आबड, झुंबरलाला भंडारी व इतर यांनी अर्वाच्य व घाणेरडे शब्द वापरून राजीनामा देण्याची मागणी करू लागले.तसेच एका बंद खोलीत तब्बल साडेपाच तास डांबून मोबाईल ताब्यात घेऊन बंद करून ठेवला.कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे चार लेखी राजीनामा अर्ज लिहून देण्यास भाग पाडले.

या प्रकरणी गोळेचा यांनी अर्जात ७ सविस्तर मुद्दे व ३७ पानांचे दस्तऐवज कागदपत्रे सादर केले असून शेवटी नमूद केले आहे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषी असणाऱ्यांना योग्य ते शासन होऊन मला माणुसकीच्या माणसासारखे जीवन जगण्याचा न्याय द्यावा.अशी अपेक्षा गोळेचा यांनी व्यक्त केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
4
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!