हिंदु जनभावना लक्षात घेता आ. नितेश राणे नगर जिल्ह्यातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला उधाण !

नाशिक, ता. २३ : गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांनी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच की काय येथील जनतेने त्यांना नगर मधून निवडणूक लढवावी असा अट्टहास देखील धरला आहे. त्यामुळे कदाचित नितेश राणे यांनी भविष्यात नगर मधून विधानसभा- अथवा लोकसभेची निवडणूक लढविल्यास कुणाला आश्चर्य वाटायला नको ? अशा प्रकारच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. असे असले तरी या प्रश्नाचे अंतिम उत्तर नितेश राणे हेच देऊ शकतात.

     नगर जिल्हा हा सुरवाती पासून अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा आहे. काही दिवसांपासून नगर शहरातील समस्यांकडे बघता नगर जिल्ह्याला राजकीय वाली आहे की नाही ? अशी परिस्थिती सध्या नगर जिल्ह्याची बघायला मिळत आहे. मात्र अशी परिस्थिती असतांना आ. नितेश राणे यांनी नगर जिल्ह्यातील हिंदूंचा समर्थनार्थ विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले आहे. म्हणजेच वेळोवेळी अधिवेशनात विधान सभेत परखडपणे नगर जिल्ह्यातील भूमिका मांडणे, विविध समस्यांवर प्रशासनाला धारेवर धरणे, लव जिहाद, धर्मांतरण अशा विविध मोर्चाचे नेतृत्व आणि सहभाग त्यांनी नोंदवला आणि एकंदरीत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी हिंदू विरोधी काम केले त्या अधिकाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र नगर जिल्ह्यात आजपर्यंत ९ ते १० अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी निलंबित केले आहे. तसेच लव जिहाद धर्मांतरण अशा विविध माध्यमातून जिहाद्यांवर गुन्हे दाखल तर काही जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर येथील हिंदू समाजाला न्याय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. याबाबत नगरकर नक्कीच त्याचे ऋणी असतील. यात शंका नाही.

 नगर जिल्ह्यातील आसलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील आमदार थेट नगर येथे येवून मार्गी लावतो याचे नगरकरांनी जोरदार स्वागतच केले आहे. कारण आजपर्यंत हिंदुत्व या विषयात नगरकरांना वाली नव्हता. पण आज नितेश राणे यांच्या स्वरूपात नगर जिल्ह्याला एक आधारस्तंभ मिळाला आहे. अशी प्रतिक्रीया नगर जिल्ह्यातील जनमानसात आहे.

 लोकांच्या दृष्टिकोनातून नितेश राणे यांच्या कामाला महाराष्ट्रासह नगर करांनी पसंती दर्शवली आहे. पुढची विधानसभा नितेश राणे नगर मधून लढवतात की काय ? अशा चर्चांना उधाण आले आहे. लोकांची ती भावना देखील आहे. असे दिसते. नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार ते हिंदू जनतेच्या पाठीशी उभे आहेत. निवडणूक लढवणे हा त्यांचा अजेंडा नसून नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठेही हिंदु बांधवांवर जिहादी मानसिकतेच्या लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी नितेश राणे त्याच्या पाठीशी नक्कीच भक्कमपणे उभा असेल आणि कायम राहील असे त्यांचे म्हणणे आहे 

गेल्या महिना भरापासून नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी काहीं जण हिंदू समाजावर हल्ले करण्यात आले. जागोजागी गाड्यांची तोडफोड,जाळपोळ दंगल घडविण्यात आली. काही ठिकाणी प्रशासनाची देखील चूक होती. याचा प्रचंड त्रास नगर वासियांना काही प्रमाणात झाला. काही निष्पाप हिंदू मुलांवर चुकीच्या खोट्या केसेस देखील टाकण्यात आल्या. पण त्यावेळी नगरकरांना काही स्थानिक राजकीय लोकांकडून अपेक्षा होत्या पण त्यांच्यामध्ये मदतीसाठी कोणीही आले नाही त्यावेळी काही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांना संपर्क केला. नगर जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा दिला त्यावेळी नितेश राणे यांनी क्षणाचा विचार न करता थेट नगर गाठले. आपल्या नेहमीच्या शैलीतून त्या निष्पाप नागरिकांवर ज्या ठिकाणी हल्ले करण्यात आले तेथे जावून प्रत्यके कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरकर या बाबतीत त्याचे उपकार कदापी विसरणार नाही. पण या संपूर्ण परिस्थितीवरून असे कळते की नगर जिल्ह्यात भविष्यात राजकीय समीकरणे नक्कीच बदलतील यात शंका नाही. अशी सध्याची एकंदरीत परस्थिती दिसून येत आहे .

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!