पोलीसांच्या ३५ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
खाकी वर्दीतून खेळाची रंगत, पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या ३५ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ९ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक येथे संपन्न झाला. मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन मा. डॉ. प्रवीण गेडाम (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या शुभहस्ताने झाले.
मा. डॉ. गेडाम यांनी मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी त्यांनी परिमंडळ-१, परिमंडळ-२, पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि इतर शाखांतील चार संघातील १३० खेळाडूंना मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभानंतर पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालय या दोन संघांमध्ये एक रोमांचक बास्केटबॉल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पोलीस आयुक्तालयाच्या संघाने विजय मिळवला. ११ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर भडांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि श्री. धनराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांनी केले.
उद्घाटन सोहळ्याला मा. डॉ. प्रवीण गेडाम, मा. प्रशांत बच्छाव (पोलीस उपायुक्त, गुन्हे), मा. मोनिका राउत (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२), मा. चंद्रकांत खांडवी, श्री. नितीन जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग), श्री. सचिन बारी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग), श्री. शेखर देशमुख, श्रीमती पद्मजा बडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग), श्री. सुधाकर सुरडकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा), श्री. सुभाष भोये (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष), श्रीमती सुरेखा पाटील (पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण/प्रशिक्षण शाखा), श्री. सोपान देवरे (राखीव पोलीस निरीक्षक), श्री. अश्पाक शेख (पोलीस उपनिरीक्षक, क्रीडा प्रभारी) आणि इतर पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते