पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची कामगिरी: नाशिक रोडमध्ये अवैध गांजा विक्रीचा पर्दाफाश

अंमली विरोधी पथकाच्या धाडीत गांजा तस्कर गजाआड: नाशिक रोडमध्ये एक किलोहून अधिक गांजा जप्त

 नाशिक रोडमध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांची धाडसी कारवाई

लाल दिवा-नाशिक,दि.१:-नाशिक रोड (प्रतिनिधी): नाशिक रोड परिसरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या धाडसी कारवाईत एका तरुणाकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८:४० वाजताच्या सुमारास बुद्ध विहार मागे, आजमीरी मोटार सायकल गॅरेजजवळ, राजवाडा, देवळाली गावात ही कारवाई करण्यात आली. समीर जमील शेख (वय २३, रा. बुद्ध विहार, राजवाडा, देवळाली गाव) याच्याकडून १ किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत अंदाजे १२,५०० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, त्याच्याकडून १०,००० रुपये किंमतीचा मोबाईल फोन, चिलीम, जॉईंट पेपर आणि ७४० रुपये रोख रक्कम असा एकूण २६,३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंमली विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षण सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने तो आपल्या ताब्यात ठेवत होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब) सह २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक रोड परिसरात अवैद्य धंदे वाढत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना वारंवार घडत असतानाही पोलीस प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची आणि अवैद्य धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!