मुक्तीभूमी विकासाचा ध्यास घेतलेले समीर भुजबळ, चप्पल प्रकरणावरून अनावश्यक वाद

मुक्तीभूमी विकासासाठी झपाटलेले समीर भुजबळ, क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

लाल दिवा-नाशिक,दि.१२:- येवला येथील मुक्तीभूमीच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहणारे माजी आमदार समीर भुजबळ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. १३ ऑक्टोबर रोजी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी ते मुक्तीभूमीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत तयारीचा आढावा घेतला. परंतु काही जणांनी त्यांच्या या भेटीला वेगळेच वळण देत एक फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोमध्ये समीर भुजबळ हे मुक्तीभूमी परिसरात चप्पल घालून फिरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

तथापि, प्रत्यक्षात घडलेली घटना आणि व्हायरल होत असलेला फोटो यामध्ये तफावत आहे असे भुजबळ समर्थकांचे म्हणणे आहे. समीर भुजबळ हे मुक्तीभूमीच्या पायऱ्यांवर चप्पल घालून उभे होते. त्यांनी कधीही विश्वभूषण स्तूप किंवा मुक्तीभूमीच्या इमारतीमध्ये चप्पल घालण्याचे अक्षम्य कृत्य केलेले नाही. हा फोटो चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात येत असून जानूनबुजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी प्रमाणेच मुक्तीभूमीला देखील तेवढेच महत्व प्राप्त व्हावे यासाठी समीर भुजबळ गतकाळापासून प्रयत्नशील राहिले आहेत. मुक्तीभूमीच्या विकासाचा प्रश्न त्यांच्यामुळेच मार्गी लागला असून आजही ते या भूमीच्या विकासासाठी तत्पर असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर असा आरोप करणे म्हणजे त्यांच्या कार्याची किंमत न करता केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

“समीरभाऊ नेहमीच मुक्तीभूमीच्या विकासासाठी धावपळ करतात. ते खऱ्या अर्थाने या मातीशी जोडलेले आहेत. अशा व्यक्तीबद्दल क्षुल्लक कारणावरून टीका करणे योग्य नाही. त्यांनी कधीही जाणूनबुजून कोणताही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही, ” असे मत येवल्यातील एका जागरूक नागरिकाने व्यक्त केले.

या घटनेवरून स्पष्ट होते की काही जणांना विकासाचे राजकारण न करता तेढ निर्माण करण्यातच रस आहे. मात्र येवल्यातील जनता यामागे लपलेला खरा हेतू ओळखून आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!