कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार रमेश वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली: कुटुंबियांना १.३१ कोटी रुपयांचा अपघात विमा
कर्तव्यपरायणतेचे उत्तुंग उदाहरण: हवालदार रमेश वाघमारे यांच्या कुटुंबियांना १.३१ कोटींचा विमा
लाल दिवा-नाशिक,दि.१०: सातपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार रमेश सखाराम वाघमारे (बॅज क्रमांक १८८१) यांचे दिनांक ०८/०६/२०२४ रोजी कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवंगत वाघमारे यांच्या कुटुंबियांना ऍक्सिस बँकेच्या अपघात विमा योजनेअंतर्गत १,३१,००,०००/- रुपयांचा धनादेश पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वाघमारे यांनी ऍक्सिस बँकेत वेतन खाते उघडले असून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले की, “रमेश वाघमारे हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. त्यांचे जाणे हे आमच्यासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व सहकार्य करू.”
याप्रसंगी प्रशांत बच्छाव, उपायुक्त (गुन्हे), चंद्रकांत खांडवी, उपायुक्त (मुख्यालय), संदीप मिटके, सहाय्यक उपायुक्त (गुन्हे), श्री दिनेश निचित श्रीमती राजश्री उडावंत, सहाय्यक उपाध्यक्ष, गंगापूर ऍक्सिस बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रमेश वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.