नाशिक शहर पोलीस दलात बदल्यांचा धडाका; रामदास शेळके यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नियुक्ती
लाल दिवा-नाशिक,२६:- – नाशिक शहर पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका पडला आहे. पोलीस आयुक्तांनी प्रशासकीय सोयीस्करता आणि सार्वजनिक हितासाठी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक शेळके हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्याकडे आता इंदिरानगर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यातून नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. तर मपोनि तृप्ती सोनवणे यांची नाशिक रोड पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. सपोनि सत्यवान पवार यांची म्हसरुळ पोलीस ठाण्यातून भद्रकाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत….