संध्याकाळी घरी परतणाऱ्या आजींना दरोडेखोरांनी लक्ष्य केले, पोलिसांकडून तपास सुरू
उपनगरात वाढता चेन स्नेचिंगचा धोका, आजी बळी
लाल दिवा-नाशिक,दि.२५:-उपनगर, (प्रतिनिधी): शहरातील सहकार कॉलनी रोडवर काल सायंकाळी घरी परतणाऱ्या ५७ वर्षीय सिंधू भास्कर फड यांना दुचाकीस्वार दरोडेखोरांनी लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. सुदैवाने सिंधूताईंना कोणतीही दुखापत झाली नाही.
सिंधूताई आपल्या मुलीला भेटून घरी परतत असताना, साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यासमोर अचानक काळ्या रंगाची दुचाकी आली आणि त्यावरील एका इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले आणि वेगाने पळून गेला. सिंधूताईंनी आरडाओरड केली पण तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथक दरोडेखोरांचा शोध घेत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून आरोपींना लवकरच पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.