दीपक बडगुजर प्रकरण: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचा आवाज फुटला! प्रशांत जाधव यांना आव्हान! राज्यपालांच्या दारात धडकणार!
दीपक बडगुजर प्रकरण: नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून जोरदार निदर्शने!
पोलीस, गुन्हेगार, प्रशांत जाधव यांनी संगनमताने केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी कारवाईची मागणी
लाल दिवा-नाशिक, दि. १८ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनाम करण्यासाठी अडीच वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, त्यांचा मुलगा दीपक यांना अडकविण्याचे षड्यंत्र थांबवावे; राजकीय सूडापोटी अटक करण्यात आलेल्या अंकुश शेवाळे याच्यावरील कारवाई मागे घ्यावी; या गोळीबार प्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधव याच्यावर खंडणी वसुली, पोलिसांची फसवणूक, ड्रग्ज प्रकरण आणि महिलांच्या अत्याचारप्रकरणी कारवाई करावी; जाधव, त्याचे साथीदार पोलीस आणि गुन्हेगार यांनी संगनमताने केलेल्या गुन्ह्यांमध्ये या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी बुधवारी शिवसेना महिला आघाडीने धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले.
अडीच वर्षांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणात शिवसैनिक अंकुश शेवाळे याला गोवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यात बडगुजर पिता-पुत्रांचा सहभाग असल्याची कबुली देण्यासाठी शेवाळे याला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली, हे षड्यंत्र त्वरित थांबवावे, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना महिला आघाडीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर ठराविक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून होत असलेल्या एकतफी कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. गोळीबार प्रकरणातील फिर्यादी अॅड. प्रशांत जाधव याने पोलीस, गुन्हेगारांच्या संगनमताने केलेल्या गुन्ह्यांची जंत्रीच पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून सादर केली. सर्व प्रकरणांची दखल घेवून पंधरा दिवसात जाधव, त्याचे साथीदार पोलीस व गुन्हेगार यांच्यावर कारवाई न झाल्यास महिला आघाडी रस्त्यावर
उतरेल. शहरातील अवैध व्यवसाय बंद करून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोहीम राबवून पोलिसांचे कर्तव्य महिला आघाडीच पार पाडेल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात शेवाळे यांची बहीण स्नेहल पाटील, जाधव टोळीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांची पत्नी, नातलग, तसेच महिला आघाडीच्या लिलाबाई गायधनी, श्रुती नाईक, शीतल भामरे, सीमा बडदे, रंजना बोराडे, नयन गांगुर्डे, प्रियंका जोशी, सीमा डावखर, भारती पाईकराव, अलका गायकवाड, स्वाती पाटील, शिल्पा चव्हाण, शिवानी पांडे, रंजना थोरवे, शोभा वाल्डे, चित्रा ढिकले, माधुरी चौधरी, वृषाली सोनवणे, योगिता गायकवाड, कीर्ती निरगुडे, एकता खैरे, फैमिदा रंगरेज, द्वारका गोसावी, निलोफर शेख, वर्षा सूर्यवंशी, कल्पना जाधव, अंजुम खान, नाजिया शेख, कीर्ती जवखेडकर आदींसह महिला कार्यकयां सहभागी झाल्या होत्या.
गंभीर गुन्ह्यांप्रकरणी जाधव
टोळीवर कारवाई करा
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील २०१९च्या खंडणीच्या गुन्ह्यात प्रशांत जाधव व गोळीबार प्रकरणातील श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या हे पंधरा दिवस कारागृहात एकाच कोठडीत होते. असे असताना २०२२ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात बारक्याला जाधवने का ओळखले नाही, याची चौकशी व्हावी. या गुन्ह्याची माहिती दडवून जाधव याने बंदुकीचा परवाना मिळवला, त्याची तसेच बंदुकीचा धाक दाखवून अनेकांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, त्याची सनद रद्द करावी. जानेवारी, फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात खोट्या नोटीसा देवून खंडणी वसूल केली, यात जाधव याचाही सहभाग होता. त्याबाबतच्या तक्रारीवरून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी चौकशीसाठी अंबडचे तत्कालीन निरीक्षक अशोक नजन यांच्याकडे तपास दिला होता. पोलीस पवन परदेशी व जाधव यांच्या दबावाला कंटाळून नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, याची चौकशी होवून कारवाई व्हावी. जाधव याने मांस विक्रेत्यांकडून उकळलेल्या खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल व्हावेत. सन २०२२ मध्ये प्रेमीयुगुलाचे केलेले ब्लॅकमेलींग व यातील युवतीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी व्हावी. फेब्रुवारी २०२४ मध्ये गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी सिडकोतील प्रतिष्ठित व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पंचवीस लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करावा. पवननगर येथे १४ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री झालेल् गोळीबारात एका माजी नगरसेवकासह आठ गुन्हेगारांचा सहभाग होता. यातील मुख्य आरोपी रोहित मल्ल्या याने आपल्याला एका नगरसेवकाने सुधाकर बडगुजर यांच्यावर गोळीबार करण्यास सांगितले होते असा जबाब अंबड पोलिसांकडे दिला आहे, या गुन्ह्याची चौकशी होवून कारवाई व्हावी. पोलीस कर्मचारी पवन परदेशी, सचिन करंजे, संजय सपकाळ, उमाकांत टिळेकर, तसेच प्रशांत जाधव व गुन्हेगारांनी संगनमताने केलेल्या गुन्ह्यांची चौकशी होवून त्यांच्यावर कारवाई व्हावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.