नाशिक शहरात चार महिन्यात ७३५ मुली बेपत्ता झाल्यानें पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे : योगिता ठाकरे, शिवसेना…!
लाल दिवा, ता.१६ : पोलीस आयुक्तांना दिलेल्या नियोजनाचा असे पुढील प्रमाणे निवेदनाद्वारे लक्षात आणू इच्छिते की, गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. गेल्या चार महिन्यात शासकीय आकडेवारीनुसार ७३५ तरुणी या बेपत्ता झाले आहे. त्यातील बहुतांश तरुणी अजूनही बेपत्ता आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नाही व त्या सापडलेल्या नाही. हे प्रकरण खूपच हृदयद्रावक व येणाऱ्या काळासाठी खूप मोठ्या प्रमाणात धोकादायक आहे. आपली नाशिक नगरी ही पौराणिक धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराची ओळख धार्मिक क्षेत्र म्हणून आहे पण अशा घटनांमुळे आपल्या शहराची मूळ ओळख पुसून एक प्रकारे गुन्हेगारी क्षेत्राची नवी ओळख निर्माण होते. गेल्या काही महिन्यापासून आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या खुनासारखे मोठे अपराध होत आहेत. त्यातल्या त्यात अल्पवयीन तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण हे या शहरासाठी नव्हे तर समाजासाठी घातक आहे.
आपण एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या नात्याने व आपल्या अनुभवाने या विषयात जातीने लक्ष घालावे. आम्हाला पोलीस प्रशासनावर संपूर्ण विश्वास आहे; परंतु अशा काही घटनांमुळे आपल्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा ही मलीन होते. तरी आपण या विषयाची सखोल माहिती घेऊन या विषयाच्या मुळाशी जाऊन या शहराला न्याय द्यावा. अशा घटनांमुळे नाशिक शहरात काही बाहेरील गुन्हेगारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना याचाही छडा लावावा. कृपया सदर बेपत्ता तरुणींची पत्त्यासह यादी देण्यात यावी. आपल्या प्रशासन स्तरावर काही त्रुटी असल्यास तेथेही जातीने लक्ष द्यावे. तसेच आपल्या पोलीस प्रशासनाकडून समाजामध्ये काही जागरूकता निर्माण व्हावी याकरता समाज प्रबोधन करण्यात यावे अशी विनंती युवती सेनेच्या मध्य विधानसभा नाशिक जिल्हा समन्वयक
योगिता ठाकरे (चौधरी) यांनी केली आहे.