“मायबाप सरकार ” भूमी अभिलेख विभागात दिव्यांग बांधवांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करणार का ?
लाल दिवा – नाशिक,ता.१६: शरीराने धडधाटकट असलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार बदल केले जातात मात्र समाजातला असाहाय्य घटक असलेल्या दिव्यांग बांधवांवर शिंदे भाजप सरकारकडून मोठा अन्याय होत आहे या दिव्यांग बांधवांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या जातील का? अशी विचारणा राज्यातल्या तमाम दिव्यांग बांधवांमधून केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून भूमी अभिलेख विभागात बदल्या प्रशासकीय बदल्या आणि विनंती बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्या दिव्यांग कर्मचारी गट क आणि गट ड क्लार्क आणि शिपाई कर्मचारी हे बाहेर जिल्ह्यात सेवा करीत आहेत, ते दिव्यांग असल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हालचाली मंदावलेल्या असतात. त्यांना त्रास होतो, खरं तर त्यांना सहानुभूतीची खूप आवश्यकता असते. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक यांनी दिव्यांग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार बदल्या तात्काळ कराव्यात, अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांमधून व्यक्त केली जात आहे.
आता मे महिन्यात होणाऱ्या बदल्यांमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक १५/१२/२००४ प्रमाणे आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 प्रमाणे आणि शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2022 त्यांचे बदल्या त्यांचे राहत्या गावाजवळ करण्यात याव्यात, असे शासन निर्णय आहेत. त्याप्रमाणे उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करतील का असा प्रश्न उपस्थित होत असून दिव्यांग बांधवांमधून अशी मागणी जोर धरु लागली आहे.