६,लाख ७० हजाराचा मुद्देमालासह अल्पवयीन सोनसाखळी चोर जेरबंद ; चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे उघडकीस , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ गुन्हेशाखा युनिट क्रमांक – १, नाशिक शहर यांची धडक कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान…!

लाल दिवा-नाशिक,ता.५:-नाशिक शहरातील चैनस्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते.

 

त्याअनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर २९२/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दि,५ ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल झाला होता. त्यावेळी गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळाची आजु बाजूचे सी. सी. टी. व्ही फुटेज प्राप्त केले होते.

 

 

सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये जबरीने चैन खेचनारे दोन संशयित इसम लाल रंगाचे व्हेस्पा मोपेड गाडीवर दिसुन आले. तेव्हापासुन गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सदर संशयित इसमाची ओळख पटवुन त्यांचा शोध घेत होते. सदर शोध घेत असतांना, गुन्हेशाखा युनिट १ चे प्रशांत मरकड यांनी गुप्त बातमी दारामार्फत सदर इसमांची ओळख पटवुन सदर इसम सिडको अंबड परिसरात राहत असल्याची माहिती मिळविली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करुन संशयित इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार भांड, पोलीस हवालदार म्हसदे, पोलीस हवालदार काठे, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस हवालदार पठाण, पोलीस नाईक मरकड, पोलीस अंमलदार कोष्टी, अशांचे पथक पाठविले असता, नमुद पथकाने त्यांना सिडको नाशिक येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे चौकशी केली असता दोन्ही इसम अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना विचारपुस केली असता त्यांनी व्हेस्पा मोपेड तसेच होंडा मोटार सायकलचा वापर करून आडगाव तसेच म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत चैनरनॅचिंगचे गुन्हे हे दोघांनी मिळून केले असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन खालील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहे.

  • १) आडगाव पोलीस ठाणे कडील। गुरनं २०९/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,

 

  • २) आडगाव पोलीस ठाणे कडील । गुरनं २८२/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
  • ३) आडगाव पोलीस ठाणे कडील गुरनं २९२/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
  • ४) म्हसरूळ पोलीस ठाणे कडील। गुरनं १७/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
  • ५) म्हसरूळ पोलीस ठाणे कडील गुरनं १३४/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
  • ६) म्हसरूळ पोलीस ठाणे कडील। गुरनं २६९/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,

तसेच विधीसंघर्षित बालकांनी चोरी केलेला मुद्देमाल हा शिरीष गणपतराव शिरवाडकर, रा-सिडको नाशिक यास विक्री केल्याने त्यास सदर गुन्हयात आरोपी करून त्यांचेकडुन वरील ६ गुन्हयातील चैनरनॅचिंग गुन्हयातील चोरीस गेलेला माल व गुन्हयात वापरलेली मोपेड व मोटार सायकल असा एकुण ६,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

वरील गुन्हयात ताब्यात घेण्यात आलेल्या विधीसंघर्षित बालक यांना त्यांच्या पालकांसमवेत मा. प्रधान बाल न्यायमंडळ, उंटवाडी नाशिक येथे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि / चेतन श्रीवंत, गुन्हेशाखा युनिट कमांक १, नाशिक शहर हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी मा. श्री. संदिप कर्णिक सोा. पोलीस आयुक्त नाशिक, श्री. प्रशांत बच्छाव सोा. पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार संदिप भांड, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नझीमखान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, महिला पोलिस अंमलदार अनुजा येलवे अशांनी केलेली आहे…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!