देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या ; गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.१८:- मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
दि.( १६)जानेवारी २०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोअं/२०६९ विलास चारोरकर यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे मोहम्मद अन्चर सैय्यद हा गुमशाबाबा दर्गा, भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत काडतुसे असे विकी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांनी वपोनि श्री. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा/३६७ प्रदिप म्हसदे, पोना/१८९४ मिलिंदसिंग परेदशी, पोअं/२०६९ विलास चारोस्कर, पोअं/२५१२ नितीन जगताप, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, पोअं/२४५० राजेश राठोड, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२२७३ अमोल कोष्टी असे पथक रवाना झाले होते, सदर पथकाने गुमशाबाबा दर्गा भद्रकाली नाशिक येथे बातमीप्रमाणे सापळा लावुन थांबलेले असतांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद अन्वर सैय्यद, रा-घर नं १० फेमस बेकरीच्या मागे, नानावली नाशिक हा त्या ठिकाणी येताच त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात ३०,०००/- रुपये कि.चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०१ जिवंत काडतुसे ५००/-रूपये कि असा एकुण ३०,५००/-रु.चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरच्या इसमावर भद्रकाली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि हॅमत तोडकर, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा / प्रदिप म्हसदे, पोहवा / धनजंय शिंदे, पोना / मिलिंदसिंग परेदशी, पोअं/ विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राजेश राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी अशांनी केलेली आहे.