अंबडमध्ये व्यापाऱ्याला ३८ लाखांचा गंडा, बँक अधिकाऱ्यांसह १० जणांवर गुन्हा!

चुंचाळे अंबडमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार, व्यापाऱ्याचे ३८ लाख रुपये लंपास!

अंबड-चुंचाळे (प्रतिनिधी) – कर्जवसुलीच्या नावाखाली व्यापाऱ्याच्या फॅक्टरीतील मशिनरी आणि इतर साहित्याची चोरी करून 38 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड चिंचोळैपोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी जयेश रामराव पोकळे (वय 30, रा. गुरुगोविंदसिंग कॉलेज समोर, इंदिरानगर, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून ओरिएंटल इंजिनिअरींग, वसई विकास सहकारी बँकेतील अधिकारी आणि अॅसरेक इंडिया लिमिटेड कंपनीसह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयेश पोकळे आणि त्यांचे वडील यांची ‘जयेश एंटरप्रायझेस’ आणि ‘लक्ष्मी इंजिनिअरींग’ या नावाच्या दोन फर्म अंबड एमआयडीसीतील डब्ल्यू 203 क्रमांकाच्या शेडमध्ये आहेत. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी वसई विकास सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. 

ऑक्टोबर २०१९ ते जून २०२३ या कालावधीत कर्जवसु

लीसाठी आरोपींनी संगनमत करून पोकळे यांच्या दोन्ही फर्ममध्ये अनाधिकृत प्रवेश केला. तारण नसलेली मशिनरी, टूल्स, कार्यालयीन वस्तू, महत्वाची कागदपत्रे, संगणक, प्रिंटर, स्कॅनर यासह सर्व साहित्य आरोपींनी चोरून नेले. तसेच, बनावट पंचनामे तयार करून १५ मशिनरी आरोपी क्रमांक २ यांना विकून टाकल्या. अशा प्रकारे आरोपींनी एकूण ३८ लाख रुपयांचा फायदा मिळवला. 

याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. ए. मुगले तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!