‘येळकोट, येळकोट जयमल्हार’ म्हणत पोलीस आयुक्तांनी घेतले प्रसिद्ध खंडोबा दर्शन…!
लाल दिवा-नाशिक,ता.२१: चंपाषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक (भा. पो. से ) हे संपूर्ण विभागीय पथकासह त्या दिवशीच्या बंदोबस्ताचा आढावा घेत देवळाली येथे स्थित खंडोबा मंदिर टेकडीची पाहणी केली. भाविकांशी संवाद साधला. मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले. प्रार्थना केली. उत्साहात सहभागी झाले.
त्याआधी, त्यांनी देवभूमितील आणखी एका पवित्र स्थळ – प्राचीन काळाराम मंदिर येथे भेट दिली. प्रार्थना केली. तसेच तेथील सुरू असलेल्या श्री रामाच्या प्राचीन काळातील अनेक अद्वितीय वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1