यंत्रमाग धारकांची समिती गठीत; मंत्री दादाजी भुसे अध्यक्षपदी …. !
लाल दिवा-नाशिक,ता.२७ : नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील यंत्रमाग उद्योगातील अडचणींच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आलेली होती. सदर लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल असे मा. मंत्री (वस्रोद्योग) यांनी सभागृहात आश्वासित केले होते. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादाजी भुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली असून यात मा. ना. श्री. दादाजी भुसे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून आ. श्री. प्रकाश आवाडे, आ. श्री. सुभाष देशमुख, श्री. रईस शेख, अनिल बाबर, प्रविण दटक व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ सदस्य सचिव
या समिती द्वारे राज्यातील यंत्रमाग बहुल भागांची प्रत्यक्ष पहाणी करून स्पष्ट शिफारशीसह व योजनेच्या विस्तृत स्वरूपासह अहवाल शासनास ३० दिवसांत सादर करणार आहे.
- सदर समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहील:
- १) राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील संघटना यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे,
- २) राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमाग धारकांच्या विविध संघटना, फेडरेशन यांच्याशी चर्चा करणे.
- ३) राज्यातीलयंत्रमाग बहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शासनास सादर करणे.
- ४) वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेतर्गत यंत्रमाग धारकांना ऑनलाईन नोंदणी करणेसाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.
- ५) यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे,
- ६) राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.
- 4) समिती राज्यातील ज्या विभागात पाहणी दौरा करतील त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.