जागतिक स्मरण दिन कार्यक्रम….!
लाल दिवा-नाशिक,ता.२:महामार्गावर रस्ते अपघातामध्ये मयत आणि गंभिर जखमी झालेल्या, अपघातामध्ये अपगंत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच अपघात पिडीतांच्या कुटुंबीयांच्या सात्वन, त्यांना कायदेशिर मार्गदर्शना करीता सामाजिक जबाबदारी म्हणुन दरवर्षी नोव्हेबर महिन्यातील ३ रा रविवार हा जागतिक स्मरण दिन म्हणुन पाळण्यात येतो. महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे कार्यक्षेत्रातील अपघातात मयत व गंभिर जखमी झालेल्या पिडीतांचे नातेवाईक यांचे सात्वनासाठी जागतिक स्मरण दिन कार्यक्रम दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा. ते १४/००वा. पावेतो रावसाहेब थोरात सभागृह, मॅरेथॉन चौक, गंगापुर नाशिक येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. रविंद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच मा.श्री. संदिप कर्णिक, (भा.पो.से) पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. शहाजी उमाप, (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, मा. डॉ. मोहन दहिकर, (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे, मा. श्री. पुष्कर जोशी, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मोटार वाहन न्यायालय, नाशिक रोड, नाशिक, अॅड. श्री. नितीन ठाकरे, सरचिटणिस, म. वि. प्र. समाज नाशिक तसेच अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन नाशिक, श्री. प्रदीप मैराळे पोलीस उपअधिक्षक महामर्गा पोलीस नाशिक विभाग, नाशिक व महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे कार्यक्षेत्रातील मृत्युंजय दुत, अपघातातील पिडीत व मयत यांचे नातेवाईक तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती प्रतिभा बोराडे व श्रीमती. वर्षा चौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपघातातील मृत व्यक्तीचे मान्यवराकडुन प्रतिमेस फुल अर्पण करुन श्रध्दाजली वाहण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना मा. डॉ. मोहन दहिकर, (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांनी केली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुधीर कोतवाल, सरकारी अभियोक्ता नाशिक न्यायालय विधी, श्रीमती. गोखले मॅडम
सरकारी अभियोक्ता, मोटार वाहन न्यायालय, नाशिक रोड, नाशिक, श्रीमती. उर्मिला सुर्यवंशी, विमा तज्ञ अधिकारी, नाशिक यांनी मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट काम करणारे मृत्युंजय दुत १) दत्तात्रय खंडु वातडे २) लोटन मोहन जगदेव ३) अकिल मोहम्मद शरीफ सैय्यद, ४) शब्बीर अब्दुल खाटीक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. रविंद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते करण्यात आला व मृत्युंजय दुत बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अतिथी मान्यवरांचे भाषण झाले. मा. अध्यक्ष मा. डॉ. रविंद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी वाहतुकीचे नियम पाळणेबाबत संबोधित केले. महाराष्ट्रात ३६०० पेक्षा जास्त मृत्युंजय दुत कार्यरत असुन त्यांनी महामार्ग पोलीसांच्या मदतीने आजपावेतो २००० पेक्षा जास्त अपघातग्रस्त लोंकाना वेळेत वैदयकिय मदत देवुन त्यांचे प्राण वाचविले आहे. तसेच मृत्यंजय दत म्हणुन जास्तीत लोंकानी काम करणे बाबत आव्हान करण्यात आले. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधिक्षक, महामार्ग पोलीस नाशिक विभाग, नाशिक यांचे मार्फतीने कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना वाहतुक नियमांचे पालन करणेबाबत शपथ देण्यात आली. श्री. प्रदिप मैराळे, पोलीस उपअधिक्षक, महामार्ग पोलीस नाशिक विभाग, नाशिक यांनी उपस्थितांचे आभार मारून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली