नाशिकमध्ये घराच्या व्यवहारावरून २२ लाखांची फसवणूक, महिलेला तेजाबाचा धाक!
तेजाबाचा धाक! महिलेची फसवणूक , वडाळा गावात खंडणीखोरी !
लाल दिवा-नाशिक,दि.२६ :-वडाळा गावात घराच्या विक्रीच्या व्यवहारातून एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडित महिलेकडून आणखी चार लाखांची खंडणी मागितली असून चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी ते अद्याप फरार आहेत.
आमरीन शोएब खान (३६) या पीडित महिलेने आपले घर विक्रीचा व्यवहार आरोपींशी केला होता. प्राथमिक व्यवहाराप्रमाणे २२ लाख रुपये आरोपींनी घेतले. मात्र, नोटरीच्या वेळी आरोपी शबनम शेख हिने अटी बदलून सही करण्यास नकार दिला. त्यानंतर सुरू झालेल्या वादात आमरीन यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांच्या चेहऱ्यावर तेजाब फेकून देऊन जीवे मारण्याची धमकी देत आणखी चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शबनमसह जुबेर शेख, मुस्कान शेख आणि जैनब शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. घटना ३ जुलै २०२१ ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे.