खा. हेमंत गोडसे व शर्मिष्ठा वालावलकर यांच्या शुभ हस्ते ३९ पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्त विद्यार्थ्यांचा सन्मान ; महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रशासकीय अधिकारी व प्राध्यापक घडवणारी एकमेव अकॅडमी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी ….!
लाल दिवा, ता. १ :
रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी राणीभवन हॉल, अशोक स्तंभ, नाशिक येथे दुपारी ३.३० वाजता आहिरे पोलीस भरती अकॅडमी नाशिक तर्फे यावर्षी ३९ विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल पदी विविध ठिकाणी महाराष्ट्रात नियुक्त झाले. या सन्मान सोहळ्यास खासदार नाशिक लोकसभा मा. हेमंतजी गोडसे कार्यक्रमाचे उद्घाटक तर मा.शर्मिष्ठा घारगे,वालावलकर IPS (Superintendent Of Police) अँटी करप्शन ऑफ ब्युरो नाशिक परिक्षेत्र प्रमुख पाहुणे व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे व नाशिक शाखा व्यवस्थापक प्रतीक जगताप सर उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला महापुरुषांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या शुभहस्ते झाल्यावर मान्यवरांचे स्वागत आहिरे अकॅडमीचे संचालक प्रा.डॉ. आनंद रत्नाकर अहिरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांनी केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त पोलीस कॉन्स्टेबल पदी किंवा वरिष्ठ महाविद्यालयास प्राध्यापक होण्यासाठी नेटसेट परीक्षा असते त्या परीक्षेसाठी सुद्धा केवळ बारा वर्षात सर्वात जास्त विद्यार्थी उत्तीर्ण करणारी एकमेव अकॅडमी आहे ती म्हणजेच आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी होय. विद्यार्थी, पालक,प्राध्यापक सर्वांना हक्काची वाटणारी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आहे. गोर गरीब गरजू अपंग विद्यार्थ्यांसाठी काम करणारी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आहे. शोषित वंचित बहुजन आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आहे.
माननीय खासदार हेमंत गोडसे यांनी आहिरे अकॅडमीचे कौतुक केले. सर्वात जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे. असे नमूद केले.
मा.शर्मिष्ठा घारगे, वालावलकर यांनी पोलीस कॉन्स्टेबल पद किती महत्त्वाचे आहे. कॉन्स्टेबल रुजू झाल्यापासून ते संपूर्ण सेवेमध्ये असताना कशाप्रकारे आपली सेवा बजवायला पाहिजे तसेच इतर नोकरीपेक्षा कॉन्स्टेबल पद किती महत्त्वाचे आहे. आयुष्याचे आणि यशस्वी जीवनाचे विविध सूत्रे मॅडमानी सांगितले.
नाशिक शाखा व्यवस्थापक प्रतीक जगताप सर यांनी आहिरे अकॅडमीचे योगदान व विद्यार्थ्यांनी बघितलेले स्वप्न आणि ठेवलेला विश्वास त्यासाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचे कौतुक केले व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही सल्ला दिला. याबद्दल आपले मत व्यक्त केले काही उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे आमच्या यशस्वीतेसाठीचे योगदान स्वतःची मेहनत व आई-वडिलांचा सहभाग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. एकूण 39 विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला.
नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल पदी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे पहिले तीन विद्यार्थी जे आले त्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मनीषा कापुरे नाशिक यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.माधुरी सूर्यवंशी नाशिक यांनी केले.