बिफ प्रकरणात खंडणी मागणारा “तो” सामाजिक कार्यकर्ता कोण ? चर्चेला उधाण..!
- तो कार्यकर्ता कोण? गोमांस खंडणी प्रकरणात गूढ!
- खंडणी प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्याचे नाव, चर्चेला उधाण
लाल दिवा… नाशिक मुंबई महामार्ग लागत बिफ च्या गाड्या तसेच जनावरांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार बहुतांश वेळी उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या ताब्यात देखील त्यांना देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर यावरून दोन गटात देखील हाणामारीचे प्रकार उघड झाले आहे. पोलीस देखील यावर लक्ष ठेवून असले तरी चोरीछुप्या पद्धतीने हा प्रकार अधून मधून सुरूच असतो असा संशय आहे. अशाच एका प्रकरणांमध्ये एका सामाजिक कार्यकर्तेचे नाव आता पुढे येऊ लागले आहे. त्याचा शोध घेणे आता पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. सदर प्रकरणांमध्ये बीफ मालकास संबंधित सामाजिक कार्यकर्त्यां कडून खंडणीची मागणी मागितल्याचे प्रकरण चर्चिले जाऊ लागले आहे.
समाजामध्ये काही अशा व्यक्ती देखील आहेत. जे सामाजिक कार्याच्या आड चुकीचे प्रकार करीत आहेत. परंतु समाज त्याला तेव्हाच मान्यता देतो जेव्हा त्याची चोरी पकडली जाते. आता ही चोरी उघडकीस येणार अशी चर्चा आता रंगू लागले आहे. परंतु तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा व्यक्ती कोण ? याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता असून त्याचा पडदा फासर लवकर झाला पाहिजे. अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.