एकीकडे सर्वत्र “महिला दिन” साजरा होत असताना…… दुसरीकडे सहकारी महिलेकडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या….. लिंग पिसाट मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे विरोधात विनयभंग व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल……….!
लाल दिवा : सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे आणि सह दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झाल्याने मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे. आपल्या वादग्रस्त कारकीर्दीमुळे आधीच बदनाम झालेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी आणि त्याच्या लिंगपिसाट सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व संतापाचे तावरण पसरले आहे. काही वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कशा पद्धतीने शोषण करतात. याचे खरे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा केल्याने या व्हाईट कॉलर लिंगपिसाटांचा बुरखा फाटला आहे. या विभागात अनेक महिला या लिंगपिसाटांच्या जाचाला बळी पडल्या आहेत का ? याची देखील चौकशी या निमित्ताने होणे आवश्यक आहे. त्यांनीही पुढे येण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग दोन येथे १ ऑक्टोबर २०२० रोजी खाजगी ऑपरेटर म्हणून कामास लागली होती. नोकरी करत असताना लिंगपिसाट दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी याने अश्लील भाषेत संवाद साधत लगट करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने नकार दिल्यानंतर तिला त्रास देणे सुरू केले. सुट्टीच्या दिवशी कामावर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. नोकरीची गरज असल्याने तिने चौधरीचा जाच सहन केला. त्यानंतर एस टु इन्फोटेक कंपनीचा इंजिनिअर देविदास कोल्हे याला सदर महिलेने चौधरी चे उद्योग सांगितले. त्यानंतर या बहाद्दराने देखील महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन ‘बाहेर एकटी भेट’ असे सांगितले. एवढेच नाही तर नोकरी करायची असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात असा उपदेशाचा डोस ही पाजला. त्यानंतर सदर तक्रारदार महिलेची सहाय्यक निबंधक कार्यालय येथे बदली झाली. तेथे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे याने देखील शरीर सुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे. २०२३ मध्ये या महिलेची सिन्नर येथे बदली करण्यात आली. तेथे कार्यरत असलेला अजय पवार याने चौधरी व कोल्हे साहेबांनी बोलवल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतर सिन्नर दुय्यम निबंधक सागर बच्छाव याने देखील जानेवारी महिन्यात पीडित महिलेशी अश्लील वर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली. प्रकरणात साहेबांचे नाव घेऊ नकोस ते पैसे देतील, ‘तडजोड करून घे, असे आमिष दाखविले प्रत्येक अधिकारी अशा घाणेरड्या पद्धतीने छळू लागल्याने पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाणे गाठत व्हाईट कॉलर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी देखील मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करत असून व्हाईट कॉलर आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. महिलेच्या तक्रारीनुसार मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगेसह दुय्यम व निबंधक प्रवीण चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.