मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना…. आज निवडणुकीला उभे असलेले मराठा समाजाचे नेते कुठे होते…… किती आंदोलनात सहभागी झाले…. याचे पहिले उत्तर द्या नंतर समाजाकडे मतांची अपेक्षा करा….. करण गायकर….मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक….!
लाल दिवा : विशेष अधिवेशनामध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या विरोधात एस आय टी चौकशी लावा त्यांना अटक करा म्हणून जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा ज्यावेळेस भाजपचे आमदार बोलत होते त्यावेळेस कुठल्या मराठा समाजाच्या आमदार खासदाराने जरांगे पाटील यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचं काम केलं एक तरी आमदार खासदाराचे नाव आम्हाला सांगा फक्त मतदान करताना मराठा समाजाने पाठिंबा द्यावा मराठा समाजाने मतदान करावं मराठा समाजाने मतदानात कुठेही विभाजन होऊ देऊ नये.हे सांगताना आपण समाजासाठी नेमकं काय केलं लोकप्रतिनिधी असताना याचंही उत्तर द्यावं त्यामुळे सकल मराठा समाजाची मतं मिळवत असताना उगाच मताचे विभाजन होईल मग अमुक जातीचा उमेदवार निवडून येईल हे न करता जो समाजासाठी लढेल जो समाजासाठी काम करेल त्याच माणसाला महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये मराठा समाजाने पाठिंबा द्यावा त्याच उमेदवारांना निवडून आणावे ज्यावेळेस मराठा समाज आपली आरक्षणाची लढाई लढत असतो त्यावेळेस सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी पक्षाचा आदेश पक्षाचे विचारधारा याचे पालन करत असतात मराठा आंदोलन करत असताना तरुणांवर गुन्हा दाखल होत असताना हेच आज निवडणूक लढणारे आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणारे पक्षांचे नेते त्या मुलांच्या मदतीला किती आले. समाज उपोषण रास्ता रोको धरणे आंदोलन करत असताना त्यावेळी या निवडणुकीला इच्छुक असलेल्या पक्षाच्या दावणीला बांधलेल्या स्वतःला आज निवडणुकीसाठी मराठा म्हणून मिरवणारे नेते कुठे असतात त्यावेळी तुम्हाला समाजाची भावना समाजाचे प्रश्न कळत नाहीत का? निवडणुकीसाठी समाजाकडे हक्काने मत मागायला येताना आपण मराठा समाजासाठी किती आंदोलन मोर्चे किती केसेस अंगावर घेतल्या हेही एकदा येऊन मराठा समाजाला सांगा त्यानंतर मराठा समाजावर मत मिळविण्याचा हक्क गाजवा इतर वेळी मराठा समाजाला दुर्लक्षित करणाऱ्या आणि निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाला मायबाप मानणाऱ्या एकही राजकीय नेत्याला मराठा समाजाची मत मागण्याचा आता अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मराठा समाज सुद्धा त्यांच्यासाठी ज्या लोकांनी काम केलं त्याच लोकांच्या पाठीशी उभा राहून आपल्या हक्काचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल.समाजाला आता कोणीही गृहीत धरू नये जो जातिवंत मराठा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाला साथ देईल आम्ही त्या उमेदवाराला साथ देण्यासाठी कटिबद्ध आहोत निवडणुका ह्या काय तुमचे कुटुंब सधन करण्याचं साधन नाही तर समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी शैक्षणिक दर्जा चांगला सुधारित करून आमच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करणारा युवकांच्या हाताला चांगले उद्योगधंदे आणून बेरोजगारी संपवणारा सक्षम उमेदवार आम्हाला हवा आहे ह्या सगळ्या गोष्टी जे करू शकतात त्यांना असेच लोक आम्ही यापुढे लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारणार........
करण पंढरीनाथ गायकर
मराठा क्रांती मोर्चा राज्यसमन्वयक
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1