क्षेत्र कोणते असो सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे :- सहा.पोलीस उपायुक्त भुसारे … .!
लाल दिवा-नाशिक,ता. १७ :- स्पर्धा परीक्षा असो अथवा क्रीडाक्षेत्र यामध्ये टिकून राहण्यासाठी सातत्य ठेवणे खूप महत्त्वाच्या असून सातत्यामुळेच व्यक्ती परिपक्व बनू शकतो,असे प्रतिपादन गरुड झेप अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपायुक्त अंबादास भुसारे यांनी केले.
गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. एस.एस. सोनवणे यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा सोबत विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात देखील करिअर व्हावे या दृष्टीकोनातून यावर्षी गरुड झेप ॲकडमीच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे…
या स्पर्धेत कबड्डी,क्रिकेट १६०० मीटर रनिंग, ८०० मीटर रनिंग,गोळा फेक इ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. दि. १७ वार बुधवारी या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपायुक्त अंबादास भुसारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भुसारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की आयुष्यात क्षेत्र निवडणे एक प्रकारे कला असून यामध्ये आपण निवडलेल्या क्षेत्रात सातत्यपूर्ण तयारी केल्यास आपण हमखास यश मिळू शकतो यात शंका नाही तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना भामरे यांनी उत्तर दिली.यावेळी सूत्रसंचालक प्रा. जी एस गाढे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण डोळस यांनी केले. यावेळी विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक : गरुड झेप अकॅडमी प्रसंगी उपस्थित मान्यवर.