ग्रामीण पोलिसांचे धाडसत्र सुरूच ; गावठी हातभट्टीवर धाड टाकून लाखो रुपयांचा माल केला उध्वस्त
लाल दिवा -नाशिक,दि.१० : पोउनि ढुमसे सोबत पोहवा सौदागर पोशि नागरे पोशि बस्ते पोशि सोनवणे यांनी पिंपळगाव मोर शिवारातील बोरीची वाडी मोराचे डोंगराचे पायथ्याशी फॉरेस्टचे जागेत झाडाझुडपांमध्ये डोंगरातून येणारे पाण्याचे ओहळालगत सकाळी 09.00 वाजता छापा टाकून गावठी हातभट्टीचे 3800 लीटर रसायन 1,90,000/ किमतीचे 17 प्लास्टिक ड्रम 5100/ रु किमतीचे
2 लोखंडी ड्रम 1000/ रु कि चे 500 रु किचा लाकडी चाटु , 1000/ रु किमतीचे जळाऊ लाकडे असा एकुण 197600/ रु किचा मुद्देमाल नष्ट करुन अज्ञात आरोपींविरुद्ध पुढील कार्यवाही करीत आहोत. नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व नाशिक ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे घोटी पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक विनोद पाटील व पोलीस उपनिरीक्षक आवारी पोलीस उपनिरीक्षक अनिल धूमसे पोलीस हवालदार सागर सौदागर पोलीस कॉन्स्टेबल संतोष नागरे पोलीस कॉन्स्टेबल बसते ड्रायव्हर सोनवणे अशाने घोटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नमूद ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे व पुढील देखील भविष्यात अशाच प्रकारची कारवाई करत राहू असे सांगितले.