आरतीेसाठी आलेल्या हिंदू पुजाऱ्यांना केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल…..! भाजपा पालक मंत्र्यांची मात्र बघ्याच्या भूमिका….. ! कानिफनाथ भक्तात तीव्र संताप…..!
लाल दिवा-नगर,दि.१४ : एकीकडे “हम सब एक है” चा नारा देत असताना दुसरीकडे नगर जिल्हा मात्र यास ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी या ठिकाणी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. दस्तर खुद्द भाजपाचे पालकमंत्री असताना देखील या ठिकाणी हिंदू बांधवांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हिंदू समाज आपल्याच जिल्ह्यात अल्पसंख्यांक झाल्याचा भास होताना दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणी आमचा वाली ठरणार आहे का ? अशा प्रकारची आर्देत हाक देताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली असून त्याबाबत संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
गुहा गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामदैवत कानिफनाथांच्या धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद सुरू आहे. सदर प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित आहे. याठिकाणी दर गुरुवारी ग्रामस्थ कानिफनाथांची आरती करतात आणि आज काही स्थानिक गावकरी हिंदू रीतिरिवाजा प्रमाणे सकाळी आरती करण्यासाठी गेले असता. काही समाजकंटकांकडून हिंदू पजाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक गोष्ट गुहा येथे घडली आहे. सदर विषयावर गेल्या वर्षभरापासून तब्बल ४ वेळा हिंदुंवर मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भातील विषय नगर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण वी.खे पाटील हे महसूल मंत्री असून देखील गुहा येथील हिंदू लोकांना आणि देवस्थानाला न्याय देऊ शकत नाही. अशी खुलेआम चर्चा स्थानिक नागरीकांकडून गावात चर्चा होते आहे.
सदर विषयात पालकमंत्री का लक्ष घालत नाही. का लोकांना अद्याप अन्याय सोसावा लागत आहे. हा प्रश्न जनमानसात व्यक्त होत आहे. सदर सरकार स्वतः ला हिंदुत्व म्हणवत आहे. याच सरकारच्या काळात मात्र हिंदू पुजाऱ्यांना माराहान होते आहे.ही चिंतेची बाब आहे. याबाबत त्वरित पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. हिंदूंना न्याय मिळवून द्यावा. ज्यांनी हे हल्ले केले यांच्यावर त्वरित कठोर कारवाही करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. यानंतर पालकमंत्री व प्रशासन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- काय विषय आहे ?
कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली चाळीस एकर जमीन कोणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली. कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला. न्यायालयाचा कोणताही निकाल नसताना कानिफनाथ मंदिरात हिंदू बांधवांना प्रशासनाने आरती करण्यापासून रोखल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पूजा आणि आरती करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत गेल्या काही महिन्यापूर्वी नागरिकांनी आंदोन केले होते. याबाबत तहसीलदारांच्या जमावबंदी आदेश मागे घेण्याच्या निर्णयामुळे अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे. मात्र आज परत एकदा याच जागेवरून वाद होऊन हिंदू पुजाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे.
चौकट
कानिफनाथ महाराजांच्या मंदिरासंदर्भात भक्तगण, पुजारी व गावकऱ्यांनी प्रशासनास सबळ पुरावे दिलेले आहेत. त्याबाबतची खातरजमाही झालेली आहे. तरी देखील प्रशासन आडमुठे पणाचे धोरण राबवत आहे. त्यास जिल्ह्याचे पालकमंत्री देखील समजावून सांगण्यास अपयशी ठरले आहेत का ? अशी शंका आता भक्तगणांना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या वादामागे नेमके आहे, तरी कोण ? असा देखील प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे.