वरखेडा मंडळात “जत्रा” शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची कार्यक्रम संपन्न …. उमाकांत देसले, प्रीती अग्रवाल, श्री.नाठे, दत्तात्रय पाटील, शैलेश शेटे,अनिल ठुबे, प्रशांत पाटील, जगन्नाथ सोनवणे, एकनाथ खराटे उपस्थित..!
लाल दिवा, ता. १ : १ मे २०२३ रोजी वरखेडा मंडळातील खेडगाव या ठिकाणी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा खेडगाव येथे जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांचे विकासाची व शासन आपले दारी हा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उमाकांत देसले, उपाभियंता सा. बा. क्र. २, श्रीमाती प्रीती अग्रवाल, मंडळ अधिकारी वरखेडा, मंडळ कृषी अधिकारी श्री नाठे साहेब, खेडगाव सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच शैलेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य -अनिल ठुबे, प्रशांत पाटील, जगन्नाथ सोनवणे तसेच पंचायत समिती दिंडोरी माजी सभापती एकनाथ खराटे उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जयराम डोखळे, शशिकांत सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, सोमनाथ गवळी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.,तलाठी खेडगाव साकिब शेख, तलाठी बोपेगाव गजकुमार पाटील, तलाठी वरखेडा भाऊसाहेब कांडेकर, तलाठी तिसगाव श्रीमती समता सोनटक्के , खेडगावच्या कृषी सहाय्यक श्रीमती सावंत मॅडम तसेच मंडळातील इतर गावांचे ग्रामसेवक व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी /कर्मचारी आपल्या विभागाच्या विविध योजनाची माहिती देने कामी उपस्थित होते. शाळेतील शिक्षक, तसेच इतर सर्व विभागातील अधिकारी /कर्मचारी.उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सर्व विभागांचे अधिकारी यांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदवत विविध योजनांची माहीती दिली. तसेच महसूल विभागामार्फत उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, संगायो मंजूर प्रकरणे आदेश वाटप करणेत आले. कृषी विभागामार्फत विविध शेतीउपयोगी साहित्य, ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. माळी सर यांनी केले.
कार्यक्रमाचे शेवटी ग्रामस्थांनी सर्व योजना बाबत माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.