नाशिक सराफ बाजारातील दुर्दैवी घटना: सुवर्णकार पिढीचे संचालक आणि त्यांचे चिरंजीव मृत्यूमुखी
लाल दिवा-नाशिक,दि.१३:-नाशिक: नाशिक सराफ बाजारातील सुवर्णकार पिढीचे संचालक श्री. गुरव आणि त्यांचे चिरंजीव यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, त्यात काही जणांनी त्यांना त्रास दिल्याचा उल्लेख आहे.
ओबीसी सुवर्णकार समितीचे गजू घोडके यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “श्री. गुरव यांना काही दिवसांपासून त्रास दिला जात होता,” असा आरोप श्री. घोडके यांनी केला आहे. “श्री. गुरव एकदा मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितले होते की त्यांना माझी गरज पडेल. आज सकाळी ही भयानक बातमी कळताच मी तात्काळ सिविल हॉस्पिटल गाठले. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. घोडके यांनी या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, असा इशाराही दिला आहे. “ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना मी कदाचित सोडणार नाही. मला त्यांचे नाव माहित आहे,” असे ते म्हणाले.
- पोलीस निरीक्षक कड यांची प्रतिक्रिया
लिहिलेली चिठ्ठी प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून, ती प्रसारमाध्यमांना दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. गुरव यांचे नातेवाईक सध्या परगावी असून, ते नाशिकमध्ये परतल्यानंतरच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू होईल आणि चिठ्ठीतील मजकुराचा तपास केला जाईल, असेही श्री. कड यांनी सांगितले.