अल्पवयीन मुली व मुलगा यांना तात्काळ शोधले…… पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.४ : मा. श्री. संदिप कर्णीक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील अल्पवयीन मुले व मुली यांना फूस लावुन पळून नेले जात आहे त्याबाबतचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले आहे.
अल्पवयीन मुले व मुली पळविण्याचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंचवटी पोलीस स्टेशन श्री. अनिल
शिंदे यांनी गुन्हेशोध पथकाचे सपोनि मिथुन परदेशी, सपोउनि अशोक काकड, पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, पोलिस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे अशांना सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने – १) दि.०१/१२/२०२३ रोजी रात्री ०२:०० वा. सुमारास अल्पवयीन मुलगी साक्षी गांगुर्डे वय १६ वर्षे ही आईशी भांडण करून
रागाच्या भरात घर सोडून गेली असता त्यांची माहिती रात्रपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हेशोध पथकास मिळताच आपले कौशल्य व जनसंपर्काचा वापर करून अवघ्या २ तासात सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेवून तिला तिच्या आजीच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. २)दि. ०२/१२/२०२३ रोजी सायंकाळी ६:०० वा. सुमारास अल्पवयीन मुलगी आशियाना शेख वय- १६ वर्षे ही कोणास काही एक न सांगता घरातुन निघून गेली असता त्याची माहिती रात्रपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हेशोध पथकास मिळताच तिचा शोध घेवून आपले
कौशल्य व जनसंपर्काचा वापर करून अवघ्या ८ तासात सदर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. ३) दि. ०३ रोजी सायंकाळी ५:०० वा. सुमारास अल्पवयीन मुलगा आयुष शंकर वय- १३ वर्षे, हा शाळेच्या कारणावरून रागावल्याने घरातुन निघून गेला बाबत माहिती दिवसपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हेशोध पथकास मिळताच त्याचा आपले कौशल्य व जनसंपर्काचा वापर करून अवघ्या २ तासात शोध घेवून सदरचा मुलगा अंबड, खुटवड नगर येथून ताब्यात घेवून त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.
अशा प्रकारे सलग तिन दिवसात रात्रगस्तच्या सर्व वाहनांना पंचवटी पोलीस ठाणेचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार संदिप लांडे व सहकारी पोलीस नाईक मच्छांद्र गोसावी, पोलीस शिपाई भरत देशमुख यांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सपोउनि अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई गोरक्ष साबळे यांना दिली व त्यानी अतिशय कमी वेळात नमुद ०२ अल्पवयीन मुली व ०१ अल्पवयीन मुलगा यांचा शोध घेवून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णीक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वपोनि/श्री. अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक/श्री. सपकाळे (गुन्हे), पोलीस निरीक्षक/श्री. बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक/श्री. मिथुन परदेशी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक/अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोना. जयवंत लोणारे, पोना. राकेश शिंदे, पोशि,कुणाल पचलारे, पोशि नितीन पवार, पोशि गोरक्ष साबळे अशांनी संयुक्तिक रित्या केलेली आहे..