गुन्हेगारांच्या कर्दनकाळ असणाऱ्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ना. रोड व.पो.नी. रामदास शेळके यांची दमदार कामगिरी…. म्हाताऱ्या आजीच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून……. २८.६ तोळे सोनं अंदाजे १६,५०,००० रूपयांचा मुद्देमा जप्त ….!
लाल दिवा : सामनगांव ता. जि. नाशिक येथील महिला नामे शकुंतला दादा जगताप वय ७५ वर्षेया दिनांक ०१/०१/२०२४ रोजी दुपारी १५:४५ वाजेचे सुमारास सामनगाव येथे त्यांचे दुकानात असताना एक अनोळखी इसमाने पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून दुकानात येवून त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांचे अंगावरील सोन्याची पोत, व इतर दागिने असे एकुण ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून गेल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गु.र.क्र ०३/२०२४ भा.दं. वि. कलम ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश शेळके हे करत होते. यासोबतच गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ च्या पथकाने आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे वय ३८वर्षे रा. कैलासजी सोसायटी, एफ-०१, रूम नं. ०५, जेलरोड नाशिक रोड यास ताब्यात घेवून नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे हजर केले. अटक आरोपीने सुरूवातीस ०३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल त्याचेकडे तपास करून हस्तगत करण्याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शेळके यांनी आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याचेकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपीने वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा/रॉड, प्लेजर मोटारसायकल क. एमएच १५ डीडब्ल्यू २२५ आरोपीकडून गुन्हयात जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीस विश्वासात घेवून तांत्रिक विश्लेषण, प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, आरोपी सातत्याने बदलत असलेली ठिकाणे याबाबत सखोल आणि कौशल्यपुर्ण चौकशी करून केलेल्या तपासात आरोपीने एकुण ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीने खालील नमुद गुन्हयांतील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून त्यांचे ताब्यातून खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद गुन्हयांत चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार नामे १) प्रशांत विष्णुपंत नागरे वय ४३ वर्षे व्य. सराफ दुकान, रा. गुरुकृपा हा. सो.सा. कॅनलरोड, जेलरोड, नाशिकरोड २) हर्षल चंद्रकांत म्हसे वय ४२ वर्षे व्य. सराफ दुकान रा. सिल्वर नेस्ट अपार्ट, विजय नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक ३) चेतन मधुकर चव्हाण वय ३० वर्षे व्य. सराफ दुकान, रा. महात्मा फुले चौक, जव्हार, जिल्हा, पालघर यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयात अटक आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात अधिकाधिक पुरावे प्राप्त करून गुन्हयाचा तपास करत आहोत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, श्री. पवन चौधरी पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके,
पोहवा/१८०८ विजय टेमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोना/५०५ बच्चे, पोशि/१९५० सागर आडणे, पोशि/२३८१ गोकुळ कासार,पोशि/२२६० रोहित शिंदे, पोशि/२०४ अरुण गाडेकर, पोशि/ २०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/१५४२ यशरानपोतन, पोशि/२१७१ संतोष पिंगळ, पोशि/२५५० भाऊसाहेब नागरे चापोशि/५५४ रानडे, पोशि/ २२५५ कल्पेश जाधव अशांनी केलीआहे.