उकाड्यामुळे तरण तलावातली गर्दी हाउसफुल !
लाल दिवा, नाशिक,ता.२१ : सध्या उन्हामुळे जीवाची काहीही होत असताना नाशिक रोड येथीलतरण तलावात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. पाच वर्षापासून ते साठ वर्षाच्या वृद्धापर्यंत सध्या गर्दी वाढत असल्याचे व्यवस्थापक माया जगताप यांनी सांगितले.
सकाळी आठ वाजे नंतर उन्हाचा तडाका सुरू होत आहे त्यातच बाहेर फिरणे मुश्किल होत आहे अनेक मुलांचे पालक नऊ नंतर बाहेर मुलांना जाऊ देत नाही म्हणून शरीराला थंडावा मिळावा या उद्देशाने तरण तलावात गर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. सकाळी सहा ते साधारण बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर तरण तलावात गर्दी असते यासाठी येणाऱ्या उन्हाळ्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील व्यवस्थापकांनी दिली आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली असताना तरन तलावात पोहणे आणि पाण्यात मजा घेण्यासाठी सध्या असंख्य लोक तरण तलावात येत आहे. म्हणून तरण तलाव हाउसफुल होत आहे.
प्रतिक्रिया उन्हाच्या काही लिहिणे लोक बेजार झालेले असतानाच तरण तलावात गर्दी वाढली आहे उन्हाळी शिबिरांचे आयोजन आम्ही करणार असून सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढते आहे.
-माया जगताप व्यवस्थापक तरुण तलाव नाशिक रोड