शिक्षण विभागात गैरवर्तनाचा प्रकार; महिला कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या आणि हल्ला
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर शिवीगाळ आणि हल्ल्याचा आरोप; गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,दीड.८ :- शहरातील शिक्षण विभागातील कार्यालयात एका व्यक्तीने अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत अश्लील शिवीगाळ केल्याची आणि हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. प्रवीण सिताराम महाजन असे आरोपीचे नाव असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ७९, ७४, १३२, ३५१, ३५२ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी यांनी रामशेज शिक्षण संस्थेतील शिक्षकांना महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. आरोपी श्री. महाजन यांनी या तक्रारीची दखल न घेता फिर्यादी यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
श्री. महाजन यांनी फिर्यादींना “मांदर**”, “बहि***” अशा अत्यंत खालच्या पातळीच्या शिवीगाळ केल्या. तसेच फिर्यादी आणि उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना लज्जास्पद अनुभव देत त्यांनाही शिवीगाळ केली. “अंगावर अॅसिड टाकून ठार मारून टाकू”, “चव्हाण भड* कुठे आहे” अशा धमक्याही त्यांनी दिल्या.
एवढ्यावरच न थांबता श्री. महाजन यांनी फिर्यादींवर हल्ला करत त्यांच्या छातीवर हात मारत त्यांना ढकलले. या घटनेमुळे फिर्यादींना मानसिक त्रास सहन करावा लागला.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरी, पोलीस निरीक्षक श्री. नाईकवाडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक श्री. आहिरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.
आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.