विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने चोरी केलेल्या दोन रिक्षा जप्त ; मोटार सायकल चोरी शोध पथकाची कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,दि.६ :-पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशीत केले आहे.
पोउनि. मुक्तेश्वर लाड व पथकातील अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पथकातील पो.ना. रविंद्र दिघे यांना रिक्षा चोरीतील संशयीत आरोपी रवि शंकर मार्ग, वडाळा जॉगींग ट्रॅक, नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती.
त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ( दि.०५)ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ४ वा. रवि शंकर मार्ग, वडाळा जॅगींग ट्रॅक, नाशिक या ठिकाणी एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपी नामे तौफिक शहा, रा. लिली व्हाईट स्कुल जवळ, वडाळा गाव, नाशिक याने विधी संघर्षित बालकाच्या मदतीने शहरातुन दोन रिक्षा चोरी केल्याची माहीती मिळाली आहे. त्यावरून चोरीस गेलेल्या रिक्षांचा शोध घेतला असता खालील रिक्षा चोरीचे खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) मुंबई नाका पोलीस ठाणे गु.र. नं. १२२६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे २) इंदिरानगर येथील गु.र.नं. ३३८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील रिक्षा MH 15/ AK 5146 ही जप्त करून पुढिल कारवाई करीता मुंबई नाका पोलीस ठाण्याचे ताब्यात दिली आहे. तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या रिक्षाचा वपोनि. श्री. अशोक शरमाळे व त्यांच्या पथकासह शोध घेवुन ती जप्त केली आहे. मुख्य आरोपी तौफिक शहा याचा शोध सुरू आहे.
सदरची कामगीरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त साो. गुन्हे, संदिप मिटके, सपोआ गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वपोनि. जयराम पायगुडे, वपोनि. अशोक शरमाळे, इंदिरानगर पो. ठाणे, पोउनि. मुक्तेश्वर लाड, पो.ना. योगेश चव्हाण, रविंद्र दिघे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पो. अं. भगवान जाधव, गणेश वडजे व मपोहवा. मंगला जगताप, सविता कदम नेमणुक विशेष पथक, तसेच पोना. अरूण परदेशी, मुश्रीफ शेख, योगेश जाधव, नेमणुक इंदिरागनर पो. ठाणे यांनी केलेली आहे
.