दोन चैन स्नॅचर इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात ; हददीत स्टॉप अँड सर्च कारावाईत सोन्याचे दागिने तसेच घातक हत्यार जप्त….!
लाल दिवा-नाशिक,ता.१:- संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नाशिक शहरात वाढते चैन स्नॅचिंगचे गुन्हे याकरिता नाशिक शहर हददीततील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्टॉप अॅन्ड सर्च करवाया करण्याबाबतचे आदेशीत केलेले असतांना इंदिरानगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श अशोक शरमाळे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हददीत (दि,३१) जुलै रोजी सायंकाळी ६ते ९ दरम्यान इंदिरानगर पोलीस स्टेशन इददीत विविध ठिकाणी ५ पोलीस अधिकारी व ३५ पोलीस अंमलदार असे वेगवेगळया ठिकाणी स्टॉप अॅन्ड सर्च कारवाई करत असतांना रथचक चौक येथे गुप्त बातमीदारांकडुन डी बी पथकाचे अंमलदार सागर कोळी यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम मोटर सायकलवर संशयितरित्या फिरत असल्याचे समजले त्या अनुषंगाने त्या परिसरात स्टॉप अॅन्ड सर्च करवाईकरित असलेले सपोनि अंकोलीकर सागर कोळी राठोड असे इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील डी बी मोबाईलमध्ये रथचक परिसरात पोहचले असता दोन संशयीत इसमांनी मोटार सायकलवर येवुन एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन खेचुन पळुन जात असतांना पाठलाग करून पकडले. सदर इसमांना पोलीस स्टेशनमध्ये आणुन चौकशी केली असता त्यांनी ८ वा सुमारास राणेनगर परिसरात एक महिलेचे मंगळसुत्र खेचले असल्याचे सांगितले तसेच त्यांनी अंबड पोलीस स्टेशन परिसरात चैन स्नॅचिंग केले असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे १) परवेज मनियार वय २५ वर्षे, रा. शिवाजीनगर, सातपुर, नाशिक २) निशांत रमेश हांडोरे रा. शिवाजीनगर, गुन्हे उघडकीस आलेले आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोउनि बी डी सोनार हे करित आहे. वर नमुद गुन्हयात १८ ग्रॅम व १६ ग्रॅम वजनाचे गळयातील सोन्याची चैन व मंगळसुत्र ळसुत्र मोटार सायकल व घातक हत्यार हस्तगत करण्यात आलेले आहे.
तसेच सदर इसमांकडुन नाशिक शहर हददीतील आणखी गुन्हयांची उकल होण्याची दाट शक्यात आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त , संदिप कर्णिक यांचे संकल्पनेतुन तयार झालेल्या स्टॉप अॅन्ड सर्च मोहिम अंतर्गत करण्यात आलेली असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस स्टेशन, अशोक शरमाळे, सापोनि अंकोलीकर, पोउनि सोनार, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, योगेश जाधव, सागर कोळी, राजेश राठोड, शामल जोशी यांनी मिळुण केलेली आहे.