जिल्हा पोलिस प्रमुख श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी : लळींग घाटात लुटमार करणा-या सराईत दरोडेखोरांचा टोळीतील दोन जणांना मालेगाव येथुन अटक….!
लाल दिवा-नाशिक,ता.२४ : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात लुटमार करणा-या टोळीतील दोन जणांना मालेगाव येथुन अटक करण्यात आली. दोघा संशयितांनी लुटमारीची कबुली दिली आहे. गुन्हा करणा-या चेतन गणेश परदेशी आणि मुजाहिद मोमीन या दोघा तरूणांना गजाआड करतांना त्यांच्याकडून मोटार सायकल, देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुसे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागाने या लुटमारीचा छडा लावला असल्याची माहिती, जिल्हा पोलिस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी दिली.
धुळयातील अनस खान हे त्यांच्या मित्रासोबत 18 जानेवारीस मालेगाव येथुन 2 लाख 45 हजार 300 रूपये घेवुन येत होते. मात्र लळींग घाटात दोन मोटार सायकलीवर आलेल्या चार जणांनी त्यांना आडविले. त्यांना हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील र्नकम लुटुन नेली. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना बरिचशी माहिती मिळाली. लळींग घाटातील लुटमार मालेगाव येथे राहणा-या चेतन परदेशी याचा मित्र मुजाहिद मोमीन, हर्ष उर्फ लहान्या जाधव, विवेक परदेशी, अजय पाटील, अर्षद कांडी यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिंदे यांनी काही सहकार्यांना सोबत घेवुन मालेगाव येथुन चेतन परदेशी आणि मुजाहिद मोमीन यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. चेतन परदेशी याच्याकडून 13 हजार रूपये रोख 1 लाखाची मोटार सायकल. चाळीस हजाराचे देशी बनावटीचे पिस्तुल, दोन हजार रूपये किंमतीचे काडतुस, दहा रूपये किंमतीचा मोबाईल, असा एकुण 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दुसरा संशयित मुजाहिद मोमीन याच्याकडून 6 हजार रूपये, मोबाईल असा 16 हजाराचा मुद्देमाल जप्त केला या दोघांच्या विरोधात मालेगाव येथील कॅम्प पोलिस ठाणे, छावणी पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. लळींग येथील लुटमारीत या दोघांशिवाय हर्षल उर्फ लहन्या जाधव, विवेक परदेशी, अजय पाटील आणि अर्षद कांडी या चौघांचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे. चौघांचा शोघ घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख धिवरे यांनी दिली.