पीआय मधुकर कड यांची जबरदस्त कामगिरी…..संदेश काजळे खुन प्रकरणी मुख्य आरोपी नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या….!

लाल दिवा-नाशिक,ता.५:- : सराईत गुन्हेगार संदेश काजळे खूनप्रकरणातील मुख्य आरोपीस पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यास सय्यदपिंप्री गावाबाहेरील वस्तीत अटक केली. संदेश चंद्रकांत काजळे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले (वय ४२, रा. ओंकार अपार्टमेंट, ड्रिम कॅस्टलचेमागे, मखमलाबादरोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास सुर्या हॉस्पिटलच्या मागे पार्कीगमध्ये, निमाणी, पंचवटी येथून संदेश काजळे यास संशयित आरोपी नितीन उर्फ पप्पू चौगुले, रणजित आहेर, स्वप्निल उन्हवणे यांच्यासह चौघांनी मारहाण करून अपहरण केले. त्यानंतर संशयित काजळे यास ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी मोखाडा (ता. पालघर, जि.ठाणे) येथे निर्जनस्थळी वाघ नदीच्या काठावर काजळेच्या मृतदेहावर ज्वलनशिल पदार्थ टाकला. अर्धवट अवस्थेत मृतदेह जाळून संशयित पळून गेले होते. याप्रकरणी प्रितेश काजळे याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयित स्वप्निल दिनेश उन्हवणे, पवन संजय भालेराव यांना अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. या गुन्ह्यातील पाच आरोपी फरार होते. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. नितीन चौघुले हा सय्यदपिंप्री गावाबाहेरील वस्तीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चौघुले यास अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!