सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला अंबड पोलीसानी केले जेरबंद …!
लाल दिवा-नाशिक,ता.२० : मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीतून मारुती इको या गाडीचे सायलेन्सर चोरी झाले होते. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा तपास करत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे संशयित आरोपी मनीष रवींद्र महाजन उर्फ सनी (वय १९ रा. शिरूर नाका श्रीराम कॉलनी अमळनेर, जळगाव), रोहित विलास पाटील (वय २२ रा. श्रमिक नगर, सातपूर ),प्रशांत रघुनाथ चौधरी( वय २० रा. अमळनेर, जळगाव), दीपक संजय पाटील ( रा. शिंदखेडा, धुळे ), लक्ष्मण छोटू खलाणी( रा. श्रीरामपूर, अहमदनगर), असलम खैराती खान( रा. मुकीमपुर, अलिगड, उत्तर प्रदेश), प्यारेलाल फिरात अली खान ( मुकीमपुर, अलीगड, उत्तर प्रदेश) यांना सापळा रचुन ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता नाशिक शहर आयुक्तालयातून १५ प्रकारचे गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकिस आणले.
सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त मोनिका राऊत ,सहा पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वसंत खतेले ,किरण गायकवाड, राकेश राऊत ,सागर जाधव ,संदीप भुरे, घनश्याम भोये, गणेश रुमाले ,गणेश पगार, यांच्या पथकाने केली संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत