नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तीन महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड

न्यायालयाचा निकाल: गुन्हेगारांना कायद्याची ‘कैद’!

लाल दिवा-नाशिक,दि.१०: कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चार आरोपींना तीन महिने कारावास आणि प्रत्येकी १०,०00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २९ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती जेव्हा पंचवटी, नाशिक येथील आरोपींच्या घरी पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांच्यासह पोलीस पथक सर्च वॉरंट बजावण्यासाठी गेले होते.

मथियास ऑगस्टस एक्का (६३), रोहित मथियास एक्का (३०), लव्हिन मथियास एक्का (२९) आणि ललिता मथियास एक्का (५२) असे आरोपींची नावे आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्यांचे गणवेश फाडले आणि त्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत दोषी आढळले.

या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. माळी आणि कोर्ट अंमलदार यांनी केलेल्या कामाचे न्यायालयाने कौतुक केले. नाशिक पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

What’s your Reaction?
+1
2
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!