२८ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्यव्यापी आधिवेशनास नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार : जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे
लाल दिवा, ता. २४ : आज दिनांक २४ मे रोजी नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आधिवेशनाची पूर्व तयारी करण्या संदर्भात नाशिकरोड येथील थींम प्लाझा हॉटेल येथे निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी वरील माहिती दिली.
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्यासह जिल्हानेते संजयजी भालेराव ,युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगारे , प्रदेशनेते पवनजी क्षीरसागर , कामगार नेते रामबाबा पठारे , युवक अध्यक्ष सनी वाघ , जिल्हा उपाध्यक्ष भारतजी निकम, जेष्ठ नेते कैलासजी पगारे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव, जेष्ठ नेत्या शांताबाई पगारे ,युवती अध्यक्ष नयनाताई वाघ आदि पदाधिकारी उपस्थित होते…
याप्रसंगी आधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात उपस्थित पदाधिकारयांनी आपले मनोगत व्यक्त केले..
याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्तिथित कैलासजी पगारे यांच्या नेतृत्वाखालील आंबेडकर राईट ऑफ पँथर पार्टी या सामाजिक संघटनेचे रिपाई -आठवले पक्षात विलीनीकरण करण्यात आले. यावेळी कैलासजी पगारे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.
तसेच नाशिक जिल्ह्यातील नाशिक , इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील प्रभारी पदाधिकारयांची नियुक्ती करण्यात आली..
निर्धार बैठकीस नाशिक जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी सर्व शहराध्यक्ष सर्व तालुका पदाधिकारी ,सर्व आघाड़यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या आयटी सेलच्या कामाचे कौतुक करून आयटी सेलच्या सर्व पदाधिकारयांचा लोंढे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.