प्रेमाच्या बहाण्याने तरुणाने रचले जाळे, लग्नानंतर तरुणीची आर्थिक, मानसिक पिळाई; फोटो व्हायरल करत समाजात बदनामी

बनावट प्रेम आणि फसवणुकीच्या जाळ्याचा पर्दाफाश, पोलीस तपास सुरू

लाल दिवा-नाशिक,दि.३० :- प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात आणि क्रूरतेची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीचा ईमेल आयडी हॅक केला, तिच्यासोबत लग्न केले आणि नंतर आर्थिक फायद्यासाठी तिचा छळ सुरू केला. पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने तरुणीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. ही संतापजनक घटना नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

प्रतिक्षा दत्तात्रय घोटेकर असे पीडित तरुणीचे नाव आहे. तिची ओळख जयदीप सिताराम सुर्यवंशी नावाच्या तरुणासोबत झाली. जयदीपने प्रतिक्षाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वासघात केला. तिच्याशी लग्न केल्यानंतर जयदीपने तिच्यावर पैशांसाठी दबाव आणायला सुरुवात केली. तसेच, तिने नकार दिल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. 

हे पुरेसे झाले नाही म्हणून जयदीपने प्रतिक्षाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आणि त्यावर तिचे फोटो एडिट करून व्हायरल केले. यामुळे प्रतिक्षाची समाजात बदनामी झाली असून, तिला मानसिक छळ सहन करावा लागत आहे. 

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जयदीपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!