सातपुर ! गोवंश जनावरांची कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्याला अटक … सोहन माछरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीने हिंदू गोरक्षकांनी मानले आभार…..!
लाल दिवा-नाशिक,दि,१९ :- सातपुर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गुंजाळ हे( दि,१८) १०. ते सकाळी चे ९. वा दरम्यान रात्रपाळी कर्तव्य असताना त्यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पीटलच्या बाजूला सातपूर नाशिक येथे गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मास चार चाकी अल्टो कार मध्ये विक्री करीता येणार असल्याची बातमी मिळाली होती सदरची बातमी ही वरीष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना कळविले असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस हवालदार खरबडे पोलीस अंमलदार शेजवळ अशांना बोलावून घेवून त्यांना सदर ठिकाणी जावून मिळाल्ल्या हा बातमी प्रमाणे खात्री करून छापा कारवाई करमेकामी पोउपनि गांगुर्डे व उपस्थित अंमलदार यांना आदेशीत केले त्यावरून पोलीस स्टेशन सातपुर गुन्हे शोध पथकाने हयात हॉटेलच्या पाठीमागे चिकन आर के मटन शॉपजवळ सापळा लावून थांबलो असता सदर ठिकाणी आर के चिकन दुकानासमोर बातमीत मिळालेल्या माहितीतील वर्णनाची एक चार चाकी अल्टो कार क्रं एम एच 03 एएम 1144 आली असता सदर कारला आम्ही स्टापसह थांबविण्याचा ईशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता पोलिसांना पाहून पळून जावू लागला तेव्हा स्टापसह त्याचा पाठलाग करून 08.20 वा व्हिक्टर सर्कल जवळ त्यास पकडले त्याने त्याचे नाव अफरोज बिसमिल्ला कुरेशी वय 49 वर्ष रा बागवन पुरा भद्रकाली नाशिक असे सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष आरोपीच्या सदर चार चाकी अल्टो कारच्या पाठीमागील बाजूल डिक्कीत व मागच्या सीटावर पाहणी केली असता सदर चार चाकी अल्टो कारमध्ये पांढ-या रंगांच्या गोण्यांमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मास मिळून आले
चार चाकी अल्टो कार मध्ये मिळून आलेल्या मांसाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 1,50,000 रू किं ची एक मारूती कंपनीची अल्टो कार क्रं एम एच 03 एएम 1144 व 12,000/- रू किंमत चे जनावरांचे कातडी काढलेले मास त्याचे अल्टो कार सह वजन 830 कि ग्रॅ तसेच मासांचे वजन 80 कि ग्रॅ रू 150/- प्रतिकिलो प्रमाणे कि अं (नाशवंत होणारा माल)
एकूण रू एकूण किं अं 1,62,000/- रू असा वर्णनाचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 02 मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमूख साहेब अंबड विभाग, पोलीस निरीक्षक माछरे सातपुर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गांगुर्डे, पोहवा खरपडे, आहेर, पोलीस अंमलदार गुंजाळ, शेजवळ, जाधव, पोअं महाले, गायकवाड यांनी केली आहे.